सध्या मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चर्चा आहे ती म्हणजे झिम्मा 2. सिनेमा अवघ्या काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झिम्मा च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. आता झिम्मा 2 ची सर्वांना उत्सुकता आहे.
झिम्मा 2 च्या रिलीजला अवघे काहीच दिवस बाकी असताना दिग्दर्शक हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत आहे. काय आहे हेमंत ढोमेची पोस्ट. पाहूया.
झिम्मा 2 च्या अॅडव्हान्स बुकींगला सुरुवात झालीय. त्यानिमित्ताने हेमंत ढोमेने पोस्ट केलीय ती चर्चेत आहे.
हेमंत लिहीतो, "या माझ्या ८ माकडांची मजा बघायला, खळखळून आनंद लुटायला आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या धकाधकीच्या आयुष्यातुन थोडं हसायला… तिकीटं बुक करा…
मंडळी, Advance booking सुरू झालंय! आता भेटूच की थेटरात!"
काल झिम्मा 2 मधलं पुन्हा झिम्मा हे गाणं भेटीला आलंय. इंदूच्या (सुहास जोशी)च्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने परदेशात रियुनियनसाठी निघालेल्या या सात मैत्रिणींचा प्रवास आता थोडा रंजक, थोडा भावनिक आणि थोडा हटके असणार आहे. 'पुन्हा झिम्मा' या बहारदार गाण्याची रंगतही आता डबल झाली आहे. अमितराज यांचे संगीत लाभलेल्या या जबरदस्त गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या भन्नाट गाण्याला वैशाली सामंत आणि अपेक्षा दांडेकर यांच्या एनर्जेटिक आवाजाने चारचांद लावले आहेत.
कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या दमदार भुमिका आहेत. 'झिम्मा २'ची सफर २४ नोव्हेंबरला घडणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.