Hemant Dhome: हेमंत ढोमे राजकारणात येणार? केलं मोठं वक्तव्य..

'सनी' चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक हेमंत ढोमेने महाराष्ट्रातील राजकारणावरही भाष्य केले.
hemant dhome talks about maharashtra politics
hemant dhome talks about maharashtra politics sakal
Updated on

hemant dhome : अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या झिम्मा चित्रपटाने धुमाकूळ घातल्यानंतर आता 'सनी' हा त्याचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हेमंत एक संवेदनशील कलाकार आहे. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर कायमच भाष्य करत असतो. सध्या तो 'सनी' चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर महत्वाचे भाष्य केले आहे.

(hemant dhome talks about maharashtra politics )

hemant dhome talks about maharashtra politics
Chinmay Mandlekar: ह्यांना काय कळतं रे? म्हणत चिन्मय मांडलेकरने सांगितला ऐतिहासिक क्षण

एका मुलाखतीत हेमंतला ''राजकारणात प्रवेश करणार का?'' असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी हेमंतने अत्यंत मोजक्या आणि मार्मिक शब्दात उत्तर दिले. हेमंत म्हणाला, 'मला राजकारणात प्रवेश करायला नक्कीच आवडेल. तो माझ्या आवडीचा विषय आहे. पण सध्या वातावरण तसं नाही. मी हे सगळं प्रचंड फॉलो करत असतो. मला कोणतेही राजकीय प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं माझ्याकडे आहेत. पण आता तसं वातावरण आजूबाजूला आहे असं मला वाटत नाही. सगळं काही खूप नकारात्मक आहे. जेव्हा तशी वेळ येईल तेव्हा मी नक्कीच विचार करेन,' असे तो म्हणाला आहे.

hemant dhome talks about maharashtra politics
Ram Gopal Varma: त्याचे 70 तुकडे करावेत.. श्रद्धा वालकर हत्ये प्रकरणी राम गोपाल वर्मा यांचे ट्विट

पुढे तो म्हणाला, 'आपण एकटे जाऊन सर्व यंत्रणेत बदल करु शकत नाही. मी आलो की सगळं साफ करुन टाकेन हे बोलायला आणि ऐकायला चित्रपटातील डायलॉगसारखं चांगलं वाटतं, पण तसं होत नाही. अनेक गोष्टी या ठरलेल्या असतात. त्यामुळे आता तरी मी हे करणार नाही.'

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा आज १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ‘सनी’ची भूमिका ललित प्रभाकरने साकारली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.