Maratha Reservation: मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय.. हेमंत ढोमेने व्यक्त केली चिंता

Hemant Dhome On Manoj Jarange Patil Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सातव्या दिवशी
Hemant Dhome On Manoj Jarange Patil Maratha Reservation
Hemant Dhome On Manoj Jarange Patil Maratha Reservation Esakal
Updated on

Hemant Dhome On Manoj Jarange Patil Maratha Reservation:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सातव्या दिवशी सुरु आहे. त्यातच आता राज्यभरात मराठा आंदोलन पेटले आहे. अनेक ठिकाणी हिंसाचार सुरु आहे.

मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. त्यामुळे बीड आणि धारशिवमध्ये संचारबंदी करण्यात आली आहे.

द्यायचं असेल तर सरसकट मराठा आरक्षण द्यावं, केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना नाही, अशी भूमिका जरांगेंनी स्पष्ट केली.

Hemant Dhome On Manoj Jarange Patil Maratha Reservation
Ashvini Mahangade on Maratha Reservation: "आता नाही तर कधीच नाही", अभिनेत्रीचा मराठा आरक्षण लढ्यात सहभाग

जरांगे पाटलांची प्रकृती खालावत असल्याने हे आंदोलन पेटले त्यामुळे जरांगे यांनी आता पाणी पिण्याचा निर्णय घेतला. मात्र मराठा आंदोलन हे शांत होत नसून अधिक हिंसक झाल्याचं दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सुरु असलेल्या या आंदोलनाने आता हिसंक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे याने यासर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Hemant Dhome On Manoj Jarange Patil Maratha Reservation
Karva Chauth 2023: 'परि, स्वरा ते कियारा! 'या' अभिनेत्री साजरा करणार पहिला करवा चौथ

दिग्दर्शक हेमंत ढोमे याने सोशल मिडियावर पोस्ट करत या प्रकरणावर भाष्य केले आहे. हेमंत आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, "आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय…मनोज  जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय… त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये! जय शिवराय!".

आता हेमंतचे हे ट्वीट सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. सरकारने जरांगे पाटलांची तब्येत आणि आंदोलन घेत असलेलं हिंसक वळण लक्षात घेता लवकरण निर्णय द्यावा असं हेमंतने म्हणतोय. सोशल मिडियावर नेटकरी या ट्विटला प्रतिक्रिया देत आहे.

Hemant Dhome On Manoj Jarange Patil Maratha Reservation
Priyanka On Kangana: "आम्ही महिला-केंद्रित चित्रपट बनवतो तेव्हा...", कंगनाच्या तेजस चित्रपटावर प्रियांकाची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर हेमंत बरोबरच काही मराठी कलाकारांनी पोस्ट शेयर करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात किरण माने देखील सुरुवातीपासूनच या प्रकरणावर भाष्य करणारी पोस्ट करत आहेत.

त्यातच आई कुठे काय करते फेम अश्विनी महांगडे हिने देखील यावर पोस्ट शेयर केली. इतकच नाही तर अश्विनीने साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांची भेट घेत जरांगे पाटलांना समर्थन केलं होतं.

Hemant Dhome On Manoj Jarange Patil Maratha Reservation
Bigg Boss 17: " ब्रेकअपनंतर एका रात्रीत माझं आयुष्य..", बिग बॉसच्या घरात अंकिताने सुशांतसोबतच्या नात्याचा केला खुलासा

तर अभिनेता रितेश देशमुख याने देखील मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया देणारी पोस्ट शेयर केली होती. आता मराठी कलाकार यावर प्रतिक्रिया देत आहे. तर दुसरीकडे या आंदोलनाचे राज्यभर पडसादही पडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.