Hemant Dhome: लोक तिकीटं काढतायत आणि शो कॅन्सल होतायत.. हेमंत ढोमे संतापला..

मराठी चित्रपटांचे शो तिकीट बुकिंग घेऊन परस्पर रद्द होत असल्याने हेमंतने ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.
Hemant Dhome tweet on pre booking show cancelled said why blame on audience
Hemant Dhome tweet on pre booking show cancelled said why blame on audience sakal
Updated on

hemant dhome : अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या झिम्मा चित्रपटाने धुमाकूळ घातल्यानंतर आता 'सनी' हा त्याचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हेमंत एक संवेदनशील कलाकार आहे. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर कायमच भाष्य करत असतो. सध्या तो 'सनी' चित्रपटाचे शो सर्वत्र सुरू असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काही ठिकाणी या चित्रपटाचे शो परस्पर रद्द करून प्रेक्षकांना पैसे परत केले जात आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून यावर हेमंतने संताप व्यक्त केला आहे.

Hemant Dhome tweet on pre booking show cancelled said why blame on audience
Bigg Boss Marathi 4: किरण माने घराबाहेर, पण खेळ सुरूच.. दिली स्पेशल पावर..

मराठी चित्रपट चालत नाही, प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, म्हणून आम्हाला शो रद्द करावा लागतो, अशी अनेकदा थिएटरवाल्यांची तक्रार असते. प्रेक्षक येऊनही जर शो रद्द होत असेल, तर हे चुकीचे आहे. असाच प्रकार घडला आहे, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपटाच्या बाबतीत. नुकताच ही चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याचे अनेकांकडून कौतुक होत असतानाच कल्याणमधील एका थिएटरमध्ये ‘सनी’चे बुकिंग घेऊन, शो रद्द झाल्याचे थिएटरकडून परस्पर कळवण्यात आले.

याबाबत प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे थेट हेमंत ढोमेंशी संपर्क साधला आहे. हा संतापजनक प्रकार केवळ एकाच ठिकाणी घडला नसून राज्यात अनेक ठिकाणी ‘सनी’चे शोज अचानक रद्द करण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर शोला गेल्यावर शो रद्द झाल्याचे प्रेक्षकांना समजले. तर काही ठिकाणी एकच प्रेक्षक असल्याने शो रद्द झाले आहेत.

याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंन ढोमे यांनी नाराजी व्यक्त केली. हेमंत ढोमे म्हणतात, ‘’ थिएटरला प्रेक्षक येत नाहीत म्हणून शो रद्द करणे, कितपत योग्य आहे? एक प्रेक्षक जरी आला तरी शो दाखवला गेला पाहिजे. बुकिंग घेऊन नंतर प्रेक्षकांना शो रद्द झाल्याचे सांगून त्यांना पैसे देणे, हे चुकीचेच आहे. मग आपण प्रेक्षकांना तरी दोष कसा द्यायचा? काही प्रेक्षकांनी हे आमच्या निदर्शनास आणून दिल्याने हा प्रकार आम्हाला कळला. हे असेच सुरू राहिले तर चित्रपट चालणार कसे?’’

Hemant Dhome tweet on pre booking show cancelled said why blame on audience
TMKOC: कृपया अफवा पसरवू नका.. अपघाताच्या बातमीनंतर चंपक चाचांनीच सांगितलं सत्य

हेमंतने याबाबत ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे. ज्या प्रेक्षकांचे शो कॅन्सल करण्यात आले त्यांचे स्क्रीनशॉट त्याने शेअर केले आहेत. यावेळी ट्विट मध्ये तो म्हणाला आहे, 'पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी… या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे! शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय! लोक सनी या चित्रपटाची तिकीटं काढतायत आणि शोज कॅन्सल केले जात आहेत! मराठी सिनेमासाठी कडक कायदा हवाच!' असे त्याने म्हंटले आहे. यामुळे मराठी चित्रपटांना थीएटर मिळण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.