paresh rawal make shocking confession before hera pheri 3 : बॉलीवूडमध्ये जे ऑल टाईम बेस्ट कॉमेडी मुव्ही मध्ये हेरी फेरीचे नाव घ्यावे लागेल. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सध्या या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाविषयी चर्चा सुरु झाली आहे.
पहिल्या हेरा फेरीला प्रेक्षकांचा जेवढा प्रतिसाद मिळाला तेवढा मात्र दुसऱ्या भागाला मिळाला नाही. त्यानं प्रेक्षकांची निराशा केली होती. त्यात आता पुन्हा तिसऱ्या पार्टमध्ये काय नवीन असणार आणि तो प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र होणार का, असा सवाल चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. हेरी फेरी, त्यानंतर फिर हेरा फेरी चाहत्यांसाठी नेहमीच आवडीचे चित्रपट राहिले आहेत.
Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत
यासगळ्यात परेश रावल यांच्या एका प्रतिक्रियेमुळे चर्चेत आले आहे. रावल यांनी गेल्या वर्षी सगळ्यांना धक्का दिला होता. त्यात त्यांनी हेरा फेरी ३ मध्ये कार्तिक आर्यन काम करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. सगळ्यात पहिल्यांदा अक्षय कुमारनं आपण हेरा फेरी ३ चा भाग होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र नंतर तो चित्रपटात काम करण्यास तयार झाला होता.
परेश रावल यांनी पुन्हा एकदा कार्तिक आर्यनच्या सहभागावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय आहे. हेरी फेरी ३ मध्ये कार्तिकची भूमिका काय असणार असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात आहे. परेश यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, हे पाहा, कार्तिकची भूमिका हेरा फेरी ३ मध्ये पूर्णपणे वेगळी आहे. तुम्ही अक्षय कुमार आणि त्याच्या भूमिकेची तुलना करु नका. ते आपल्या सगळ्यांसाठी धोक्याचे असेल.
काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की, मी आता माझ्या बाबूराव आपटे नावाच्या पात्रावरुन जे मीम्स आहेत ते पाहून कंटाळलो आहे. गेली कित्येक वर्षांपासून हेरा फेरीचे मीम्स हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात आता काही बदल व्हावेत ही माझी इच्छा आहे. २००६ मध्ये हेरा फेरी नावाचा चित्रपट आला होता. त्याला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसादही मिळाला.
मला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगावी लागेल ती म्हणजे फिर हेरा फेरीच्यावेळी आम्ही पूर्णपणे योगदान दिले नाही. त्याचा परिणाम जो झाला तो आपल्यासमोर आला. हा चित्रपट प्रेक्षकांना म्हणावा इतका काही आवडला नाही. आम्ही आणखी कथेकडे लक्ष द्यायला हवे होते. असेही रावल यांनी यावेळी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.