खूप प्रतिक्षेनंतर अखेर बातमी कानावर पडतेय की निर्माता फिरोज नाडियादवाला लवकरच कॉमेडी सिरीज हेराफेरीचा तिसरा(Hera Pheri 3) भाग घेऊन आपल्या भेटीस येतोय. लवकरच तो सिनेमाची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. फिरोजनं सांगितलं आहे की या सिनेमातले मूळ कलाकार अक्षय कुमार(Akshay kumar),परेश रावल,सुनिल शेट्टी हेच मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा कॉमेडी सिनेमा २००० साली प्रदर्शित झाला होता. १९८९ मध्ये मल्याळम सिनेमा 'रामजी राव स्पीकिंग' याचा तो रीमेक होता.(Hera Pheri 3 confirmed with Akshay Kumar, Suniel Shetty and Paresh Rawal)
2000 साली आलेल्या सिनेमाचा सिक्वेल 2006 साली रिलीज झाला होता. यामध्ये अक्षय कुमार,परेश रावल,सुनील शेट्टी हे तिघे राजू,बाबूराव,श्याम या व्यक्तिरेखा साकारताना दिसले होते. फिरोज नाडियादवालानं 'हेराफेरी 2' ची निर्मिती केली होती. या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची फिरोज नाडियादवालाच निर्मिती करणार आहे.
एका हिंदी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत फिरोज म्हणालेयत की, ''प्रेक्षकांची प्रतिक्षा लवकरच संपेल. सर्वजण याचा तिसरा भाग पाहू शकतील. ते देखील-अक्षय,सुनिल आणि परेश या तगडया जुन्या टीमसोबत. कथा तयार आहे. आम्ही काही गोष्टींवर काम करीत आहोत. जुन्या सिनेमासारखाच हा देखील सिनेमा बनवला जाईल. व्यक्तीरेखांमधील भोळेपणा तसाच कायम राहिल. पण अजूनही ठाम असं सांगता येणार नाही. कथा,पटकथा,व्यक्तिरेखा आणि त्यातील बदल याबाबतीत आणखी थोडा वेगळा विचार करुन गरज भासली तर तसे बदल करता येतील''.
'हेराफेरी'च्या या तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन कोण करणार? याविषयी बोलताना फिरोज नाडियादवाला म्हणाले की,''आम्ही काही जणांची नावं फायनल केली आहेत. त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाईल. या सिनेमाचा पहिला भाग प्रियदर्शननं दिग्दर्शित केला होता. दुसरा नीरज वोरानं. दुसरा भाग दिग्दर्शकानेच लिहिला होता. तिसरा भाग ही मोठी जबाबदारी आहे कारण लोकांच्या आशा वाढल्यात''.
'हेराफेरी 3' 2014 सालीच येणार होता. पण गणितं जुळून आली नाहीत आणि सिनेमा पुढे ढकलला गेला. नीरज वोराच त्यावेळी सिनेमाच्या तिसऱ्या भागावर काम करीत होता. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो प्रोजेक्ट पुढे ढकलला. 2017 मध्ये निरज वोराचं निधन झालं. एक वर्ष तो कोमात होते. त्यावेळी अक्षय या सिनेमाचा भाग बनणार नव्हता. जॉन अब्राहम,अभिषेक बच्चन यांचा सिनेमाच्या तिसऱ्या भागात तेव्हा समावेश होणार होता. पण सगळंच बारगळलं,पण आता कथानक बदलण्यात आलं आहे. आणि अक्षय कुमारही सिनेमात काम करायला तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.