..म्हणून हेमा मालिनीशी लग्न करण्यास गिरीश कर्नाड यांचा होता नकार

बॉलिवूडच्या 'ड्रिम गर्ल'शी लग्न करण्याचं अनेकांचं स्वप्न होतं.
hema malini, girish karnad
hema malini, girish karnad
Updated on
Summary

बॉलिवूडच्या 'ड्रिम गर्ल'शी लग्न करण्याचं अनेकांचं स्वप्न होतं.

सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री हेमा मालिनी Hema Malini यांनी बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांसोबत अनेक अभिनेत्यांना होती. बॉलिवूडच्या 'ड्रिम गर्ल'शी लग्न करण्याचं त्याकाळी अनेकांचं स्वप्न होतं. पण अभिनेते व लेखक गिरीश कर्नाड Girish Karnad यांनी मात्र हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यास साफ नकार दिला होता. उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेल्या गिरीश कर्नाड यांच्या आत्मचरित्रात हा प्रसंग सांगितला आहे.

१९७४-७५ दरम्यान गिरीश कर्नाड हे पुण्यातील FTII संस्थेच्या अध्यक्षपदी होते. त्यावेळी त्यांना हेमा मालिनी यांच्या लग्नाचा प्रस्ताव आला होता. कर्नाड यांनी आत्मचरित्रात लिहिलं की, "त्यावेळी जया चक्रवर्ती या स्वामी चित्रपटाची निर्मिती करत होत्या. त्यामध्ये मी मुख्य भूमिका साकारावी अशी त्यांची खूप इच्छा होती. मला त्यांच्याकडून आमंत्रणं येऊ लागली होती. हळूहळू मला त्यामागचा त्यांचा हेतू कळून चुकला होता. हेमा मालिनीसाठी त्या मुलगा शोधत होत्या. तेव्हाच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा होत्या. हेमा मालिनी यांच्या जीवनाची नवी सुरुवात व्हावी अशी त्यांची इच्छा होती."

hema malini, girish karnad
'अनुपमा' फेम पारसने फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले इअरफोन्स; बॉक्स उघडताच..

हेमा मालिनी तेव्हा बॉलिवूडमध्ये यशस्वी आणि अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री होत्या. जया चक्रवर्ती यांनी 'रत्नदीप' चित्रपटात हेमा मालिनी आणि कर्नाड यांना मुख्य भूमिकांसाठी निवडलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेमा मालिनी यांनी कर्नाड यांना विचारलं की, "आपल्या लग्नाच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापून येत आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे?" त्यावर गिरीश कर्नाड यांनी उत्तर दिलं, "माझ्यासाठी बातम्या काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. माझ्याकडे एक विशेष कारण आहे, ज्यामुळे मी लग्नासाठी नकार देतोय."

आत्मचरित्रात कर्नाड यांनी पुढे लग्न नाकारण्यामागचं कारण लिहिलं. 'हेमा मालिनी यांच्याशी मी लग्न करणं अशक्य होतं. त्यावेळी सरस्वतीला मी लग्नासाठी विचारलं नव्हतं. पण तिने नकार दिला असता तरी मी हेमा यांच्याशी लग्न केलं नसतं. कारण, एकदा मी हेमा यांना विचारलं होतं की, तू तमिळ चित्रपटांमध्ये का काम करत नाहीस? त्यावर ती हसून म्हणाली की, तिथली माणसं किती काळी असतात. त्या प्रसंगानंतर माझ्या दृष्टीने हेमा मालिनी हे प्रकरण संपलं होतं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.