'1 करोड भरा नाहीतर...'; रणबीरच्या शमशेराला ओटीटी रिलीजसाठी हायकोर्टाचा दणका

बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरलेला रणबीरचा शमशेरा आता कोर्टाच्या परवानगीनं OTT वर रिलीज होतोय, पण १ करोडचा दंड कोर्टानं ठोठावल्यानं सिनेमा पुन्हा चर्चेत आलाय.
High Court allows screeining Of Shamshera on Ott, has to pay 1 crore for that
High Court allows screeining Of Shamshera on Ott, has to pay 1 crore for that Google
Updated on

Shamshera OTT: दिल्ली हायकोर्टानं रणबीर कपूरच्या(Ranbir Kapoor) 'शमशेरा'(Shamshera) सिनेमाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी परवानगी दिली आहे. पण यासोबतच कोर्टानं(High Court) आदेशही जारी केला आहे की यशराज फिल्म्सला २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत कोर्टात १ करोड रुपये जमा करावे लागणार आहेत. हे प्रकरण कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आहे.(High Court allows screeining Of Shamshera on Ott, has to pay 1 crore for that)

High Court allows screeining Of Shamshera on Ott, has to pay 1 crore for that
भारतीय रेल्वेची करिनानं उडवली खिल्ली, ऐकून भडकले लोक; म्हणाले,'ही किती...'

शमशेराच्या ओटीटी रिलीजशी सबंधित प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती ज्योती सिंग यांनी एक आदेश जारी केला आहे. हा आदेश विक्रमजीत सिंग भुल्लर यांच्याकडून दाखल झालेल्या वादग्रस्त केसशी संबंधित आहे. भुल्लर यांनी आरोप केला आहे की सिनेनिर्मात्यांनी त्यांचे साहित्य असलेल्या 'कबहु ना छाडे खेत'च्या कॉपीराइटचे उल्लंघन केलं आहे.

High Court allows screeining Of Shamshera on Ott, has to pay 1 crore for that
लाल सिंग चड्ढामुळे विजय देवरकोंडाही अडचणीत; Boycott Liger म्हणू लागले लोक..

न्यायमूर्तींनी १८ ऑगस्ट २०२२ ला जारी केलेल्या आदेशात उल्लेख केला आहे की सिनेमा गेल्या महिन्यात सिनेमागृहात रिलीज झाला आणि येत्या शुक्रवारी ओटीटीवर या सिनेमाला रिलीज करण्याचा प्लॅन आहे. ते म्हणाले की,''त्यामुळे दोन्ही पक्षातला वाद चिघळू नये यामुळे हेच योग्य होईल की २२ ऑगस्ट पर्यंत १ करोड रुपये जमा केल्यानंतरच सिनेमा ओटीटीवर रिलीज करु दिला जाईल''.

High Court allows screeining Of Shamshera on Ott, has to pay 1 crore for that
'सेक्ससाठी पुरुषाची गरज नाही तर..', कनिष्का सोनीचा ट्रोलर्सवर पलटवार

कोर्टाकडून असं देखील सांगण्यात आलं आहे की,''जर पूर्ण रक्कम जमा केली गेली नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणली जाईल,जी २३ ऑगस्टपासून असेल''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.