Amitabh Bachchan: अमिताभ यांनी दाखल केलेली 'पर्सनॅलिटी राइट्स' याचिका नेमकी आहे तरी काय?

या याचिकेनंतर अमिताभ यांचा आवाज, फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यास न्यायालयाने सक्त मनाई केली आहे.
high court passes restraining  Infringement of Amitabh Bachchan personality rights, but what is personality rights ?
high court passes restraining Infringement of Amitabh Bachchan personality rights, but what is personality rights ?sakal
Updated on

Amitabh Bachchan personality rights : बॉलीवूडचे दिग्गज महानायक अमिताभ बच्चन कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी कोण बनेगा करोडपतीमुळे तर त्यांच्या सोशल मीडिया वरील पोस्टमुळे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'उंचाई' या त्यांच्या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. पण आता ते चर्चेत आले आहेत ते त्यांच्या हक्कांचा मुद्दा घेऊन. आपले 'व्यक्तीमत्त्व हक्क' म्हणजेच 'पर्सनालिटी राईट्स' धोक्यात आल्याचे सांगत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि याचिका मंजूरही करून घेतली. म्हणूनच आज जाणून घेऊया हे 'पर्सनालिटी राईट्स' म्हणजे नेमकं काय आहे?

(high court passes restraining Infringement of Amitabh Bachchan personality rights, but what is personality rights?)

high court passes restraining  Infringement of Amitabh Bachchan personality rights, but what is personality rights ?
Arjun Rampal Birthday: ड्रग्ज प्रकरण, घटस्फोट, अफेअर.. असं आहे अर्जुन रामपालचं 21 वर्षांचं करिअर..

अमिताभ यांनी व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला आणि न्यायालयाने त्याला मंजूरी देखील दिली. त्यानुसार आता अमिताभ यांचा आवाज, फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरण्यास न्यायालयाने सक्त मनाई केली आहे. तसे केल्यास दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते. पण अमिताभ यांच्यावर असे करण्याची वेळी का आली आणि 'पर्सनालिटी राईट्स'चे संरक्षण यांनी का मागितले हे जाणून घेणे गरजेचे आहे.

high court passes restraining  Infringement of Amitabh Bachchan personality rights, but what is personality rights ?
Rakhi Sawant Birthday: एक मुका आणि करियर घडलं, मिका आणि राखीच्या ऐतिहासिक किसची गोष्ट

सध्या असे झाले आहे की अमिताभ बच्चन यांची ख्याती आणि प्रभाव इतका आहे की प्रत्येकालाच आपल्या प्रमोशनसाठी त्यांचा आवाज यांचे फोटो वापरावेसे वाटतात. अर्थात आशावेळी परवानगी कुठून मिळणार, त्यांचे मानधन परवडणार का असे अनेक प्रश्न समोर असल्याने लोक सर्रास यांच्या नकला करून त्यांचा आवाज आणि फोटो स्वतःच्या व्यवसायासाठी वापरू लागले आहेत. हा एकप्रकारचा गैरवापर देखील म्हणता येईल. अगदी लॉटरीच्या टिकीटांवरही त्यांचा फोटो छापला जात असल्याने अमिताभ यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.

याशिवाय अनेक ठिकाणी 'कोण बनेगा करोडपती' म्हणजे केबीसीशी संबंधित पुस्तकं छापणारे, टी-शर्ट विकणारे अनेक व्यावसायिक आहे. त्यामुळे एकूणच आपले व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अमिताभ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या यचिकेवर न्यायालयाने अमिताभ यांना दिलासा दिला आहे. तर विना परवानगी अमिताभ यांचा आवाज आणि फोटो वापरू नये, असेही त्यांनी म्हंटले आहे. या याचिकेवर पुढच्या वर्षी मार्च महिन्यात सुनावणी होणार आहे.

त्यामुळे कालपासून 'पर्सनॅलिटी राईट्स' हा शब्द चांगलाच चर्चेत आला आहे. पर्सनॅलिटी राईट्स म्हणजे कोणतीही स्त्री किंवा पुरुषाला हा व्यक्तिमत्व हक्क जपण्याचा अधिकार असतो. लोकप्रिय व्यक्तींसाठी हा अधिकार खूप महत्त्वाचा मानला जातो. समाजात त्यांच्या नावाचा, फोटोचा किंवा आवाजाचा वापर विना परवानगी व्यवसायासाठी केला जातो. अशा प्रकारचा गैरवापर होत असल्याने अशा वापरावर प्रतिबंध करण्याचा अधिकार या हक्का अंतर्गत मिळतो. शिवाय तसे कोणी केल्यास कारवाई करण्याची मुभा देखील मिळते. हा एकप्रकारे 'कॉपीराईट' म्हणजेच 'स्वामित्व हक्काचाच' प्रकार आहे. भारतीय संविधानाच्या 21व्या परिच्छेदात गोपनीयता आणि प्रसिद्धीबाबत हा अधिकार दिलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.