Bollywood: 'वध' सिनेमा करण्यामागे 'हे' एकच कारण,नाहीतर नकार पक्का होता; नीना गुप्ता स्पष्टच बोलल्या...

नीना गुप्ता आणि संजय मिश्रा या एनएसडीमध्ये एकत्र शिक्षण घेतलेल्या मातब्बरांनी 'वध' मध्ये साकारलेला प्रत्येक सीन अंगावर काटा आणतो.
The main reason why I wanted to do VADH was...Neena Gupta Says
The main reason why I wanted to do VADH was...Neena Gupta SaysInstagram
Updated on

Bollywood: बहुप्रतिक्षित आगामी क्राईम थ्रिलर 'वध'या चित्रपटात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांना पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये पाहायला मिळणार असल्याने याची चर्चा सर्वत्र आहे. अलीकडेच, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांचा उकृष्ट प्रतिसाद मिळाला. थ्रिल ने भरपूर असलेल्या या चित्रपटात, एक भावनिक घटकदेखील आहे जो प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करेल.

तसेच, 'वध'चे कलाकार संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचे शिक्षण एकाच शाळेत झाले आहे याची कल्पना फार कमी लोकांना आहे. एक काळ असाही होता जेव्हा नीना गुप्ता यांच्या उपस्थितीने संजय मिश्रा यांना वेड लावले होते.(The main reason why I wanted to do VADH was...Neena Gupta Says)

The main reason why I wanted to do VADH was...Neena Gupta Says
Shahrukh Khan Video: शाहरुखला पाहून बसल्या जागेवर उडाली हॉलीवूड अभिनेत्री.. तिचे हावभाव बघाल तर..

निर्मात्यांनी आज 'वध' चित्रपटाचे बिहाइंड द सिन्स (Behind The Scenes) रिलीज केले. यामध्ये आपण नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांना त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांतील तसेच त्यांच्या शूटिंगच्या दिवसातील मजेशीर किस्से शेअर करताना पाहू शकतो. याबद्दल बोलताना नीना गुप्ता सांगतात, “मला 'वध' चित्रपट करायचा होता याचे मुख्य कारण म्हणजे मला संजय मिश्रासोबत काम करायचे होते." केमिस्ट्रीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "तुमचे सहकलाकार चांगले असतील तर केमिस्ट्री आपोआप रंगते."

यावर संजय मिश्रा म्हणाले, “आम्ही दोघेही एकाच संस्थेचे आहोत जीचे नाव एनएसडी (NSD) आहे. नीनाजी माझ्या सिनिअर आहेत. एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा मी नीना गुप्ता यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांना पाहताच मी झुडपात पडलो. त्यांनी माझ्या पत्नीची भूमिका साकारली आहे आणि मी त्यांना कधीच 'तुम' म्हणू शकत नव्हतो, मी त्यांना फक्त 'आप' म्हणायचो." अशातच, हा चित्रपट अशा परिस्थितीवर आधारित आहे जिथे मुले म्हातारपणात आई-वडीलांकडे दुर्लक्ष करतात. अशा पालकांचा दुःखद प्रवास तसेच नंतर त्यांना होणाऱ्या संघर्षांवर 'वध'या चित्रपटाची कथा प्रकाश टाकते.

The main reason why I wanted to do VADH was...Neena Gupta Says
Marathi Serial: स्वामी समर्थांशी तितिक्षाचं आहे खास नातं; अक्कलकोट मधला 'तो' अनुभव तुम्हालाही करेल थक्क..

दर्शकांनी संजय मिश्रा यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारताना पाहिलं असून प्रेक्षक आता त्यांना पहिल्यांदाच पडद्यावर एक अनोखी व्यक्तिरेखा साकारताना पाहतील. 'वध'हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधूद्वारा लिखित आणि दिग्दर्शित असून, जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. तसेच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. हा चित्रपट ९ डिसेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.