टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिका आहे. नेहमीच अनेक कारणांमुळे हा शो चर्चेत असतो . शैलेश लोढा या शोमधील 'मेहता साहब' बरोबरच शोमधील अनेक पात्रांनी अचानक 'तारक मेहता'चा निरोप घेतला. त्यातच टप्पूच्या भूमिकेत दिसणारा राज अनादकटही बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये दिसलेला नाही. त्याच्या पुनरागमनाबाबत बरीच अटकळ होती. पण आता त्याने शोचा निरोप घेतला आहे. (Tarak Mehta ka ooltah chashmah fame raj anadkat quits the show)
टप्पूचे पात्र बरेच दिवस शोमधून गायब होता. त्यामूळे प्रेक्षकांना याचा अंदाज आला होता. आपल्या इंस्टाग्राम पोस्ट करत राजने याबद्दल माहिती दिली. राजने लिहिले की, “सर्वांना माझ्या शुभेच्छा. आता वेळ आली आहे की मला विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्न आणि बातम्यांना पूर्णविराम द्यावा. नीला फिल्म प्रॉडक्शन आणि तारक मेहता का उल्टा चष्मासोबतचा माझा संबंध अधिकृतपणे संपुष्टात आला आहे. हा प्रवास खूप सुंदर होता. या दरम्यान मी अनेक गोष्टी शिकलो, चांगले मित्र बनवले. मी माझ्या कारकिर्दीतील काही सर्वोत्तम क्षण या सेटवर घालवले आहेत."
राज पुढे लिहितात की, “या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचे मी आभार मानतो. तारक मेहता का उल्टा चष्माची संपूर्ण टीम, माझे मित्र, माझं कुटुंब आणि तुम्ही सर्व चाहते. या शोमध्ये ज्यांनी माझे स्वागत केले आणि मला टप्पू म्हणून प्रेम दिले त्या सर्वांचा मी आभारी आहे. मी तारक मेहताच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी मी लवकरच परत येईन. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या".
हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....
खूप दिवसांपूर्वी राजने तारकचे शूटिंग थांबवलं होतं. त्यामुळेच त्याच्या बाहेर पडण्याबाबत चाहत्यांना प्रश्न पडले होते. राज लवकरच एका नवीन प्रोजेक्टमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये राज यांनी भव्य गांधीची जागा घेतली होती. आता नवा 'टप्पू' कोण असेल, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.