'भद्रकाली' च्या रूपाने उलगडणार 'एकमेव' महिला सरसेनापतींची शौर्यगाथा

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘भद्रकाली’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली.
 'Bhadrakali'
'Bhadrakali'file image
Updated on

शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर मराठा साम्राज्यातील 'एकमेव' महिला सरसेनापती 'श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे' यांच्यावर आधारित ‘भद्रकाली’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. प्रसिद्ध निर्माता पुनीत बालन(punit balan), लेखक दिग्पाल लांजेकर(digpal lanjekar), दिग्दर्शक प्रसाद ओक (prasad oak) आणि संगिताकार अजय-अतुल(ajay- atul) यांनी एकत्र येऊन या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे.(historical film 'Bhadrakali' based on the 'only' female commander in the Maratha Empire 'Rich Commander Umabaisaheb Khanderao Dabhade' has been announced.)

शिवराज्याभिषेकदिनाच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला मुजरा करत ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘भद्रकाली’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाची गोष्ट १८ व्या शतकातील छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडातील, मराठा साम्राज्यातील एका अशा वीरांगनेची आहे जी आपल्या पराक्रमाने मराठा साम्राज्याची एकमेव महिला सरसेनापती ठरली. खुल्या मैदानातील युद्ध अफाट शौर्याने जिंकल्यामुळे आधुनिक काळातील त्यांचे कर्तृत्त्ववान स्त्री म्हणून महत्त्व अधोरेखित होते. अद्भुत असं शौर्य गाजवणाऱ्या या लढवय्या 'श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे' यांचा उल्लेख ‘भद्रकाली’ असा का झाला? याचा रंजक इतिहास म्हणजे ‘भद्रकाली’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होत असून उमाबाईसाहेब यांचे वंशज, ‘श्रीमंत सेनाखासखेल सरसेनापती सत्यशीलराजे दाभाडे’ यांची ऐतिहासिक संदर्भांसाठी वेळोवेळी बहुमोल मदत होत आहे.

 'Bhadrakali'
The Family Man 2: जे.के. तळपदेनं अभिनयासाठी सोडली नोकरी, विकले पत्नीचे दागिने

लेखक दिग्पाल लांजेकर यांची प्रभावी लेखणी कायमच आपल्याला प्रत्यक्ष इतिहासात घेऊन जाते आणि चित्रपट संपेपर्यंत तो कालखंड आपण प्रत्यक्ष जगत राहतो ! शिवाय सुपरहिट ठरलेल्या ‘हिरकणी’ सारख्या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा अनुभव असलेले दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या प्रभावी दिग्दर्शनामुळे - ‘भद्रकाली’ Larger than life ठरेल हे नक्की आणि अजय-अतुल यांच्या ‘म्युझिक’मुळे चित्रपटाचे संगीत अजरामर होईल यात शंका नाही. पुनीत बालन यांच्या भक्कम पाठबळाने ही कलाकृती अतिशय भव्यदिव्य होईल याची खात्री वाटते.

 'Bhadrakali'
Video: 'सरसेनापती हंबीरराव' मधील महाराजांचे सिंहासनाधिश्वर दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.