Hockey World Cup: हॉकी विश्वचषक सोहळ्यात रणवीर सिंग घालणार धिंगाणा

Hockey World Cup
Ranveer Singh
Hockey World Cup Ranveer Singh Esakal
Updated on

Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषक 2023 हे 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारत या स्पर्धेच्या 15 व्या आवृत्तीचे यजमानपद भूषवत आहे. 2018 मध्येही भारताने विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते आणि यावेळीही भारत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे.

Hockey World Cup
Ranveer Singh
Hockey World Cup 2023 : भारतीय हॉकीपटू कोटीत खेळणार; ओडिसाचे मुख्यमंत्री पटनायक यांची घोषणा

भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम आणि राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 16 संघांच्या या स्पर्धेत एकूण 44 सामने खेळवले जाणार आहेत. राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियम हे भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम आहे. या स्पर्धेत एकूण 288 हॉकीपटू आपले कौशल्य दाखवतील. या स्पर्धेचा अंतिम सामना १९ जानेवारीला होणार आहे.

Hockey World Cup
Ranveer Singh
Urfi Javed: 'म्हणूनच मी पूर्ण कपडे घालत नाही', शेवटी ऊर्फीनं सांगितलं कारण

दरम्यान आता या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासंबधीत बातमी समोर आली आहे. या उद्घाटन समारंभात बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग आपल्या बिनधास्त डान्सने कार्यक्रमात रंगत आणणार आहे.

Hockey World Cup
Ranveer Singh
Hockey World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 साठी भारतीय हॉकी संघाची घोषणा; हरमनप्रीत कर्णधार

हॉकी वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्यात अभिनेता रणवीर सिंग आणि कोरियन पॉप बँड ब्लॅक स्वान यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. भारताने हा विश्वचषक जिंकल्यास सर्व खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.