Holi Song: सिनेमातील होळी संबंधित गाण्यांविषयी बोलायचं झालं तर 'ये जवानी है दिवानी' सिनेमातील 'बलम पिचकारी..' हे गाणं आजही लोकांना तितकंच प्रिय आहे. खूप मस्ती,उत्साहानं भरलेलं हे गाणं लोकांना आपल्या तालावर थिरकायला लावतं.
जेवढी धमाल हे गाणं पाहताना येते तितकीच डबल धम्माल शूटिंगच्यावेळी झाली होती. पडद्यामागचा तो मजेदार किस्सा रणबीर कपूरनं एकदा सांगितला होता. चला,जाणून घेऊया त्याविषयी.(Holi Song Yeh Jawaani hai deewani song- read inside story)
या गाण्याला रणबीर कपूर,दीपिका पदूकोण,कल्कि कोचलिन आणि आदित्य कपूर यांच्यावर चित्रित केलं जाणार होतं. त्यांच्याव्यतिरिक्त या गाण्यात खूपसारे बॅकग्राऊंड डान्सर्स होते. या गाण्यातला माहौल एकदम फुल्ल ऑन मस्तीवाला होता,जो स्क्रीनवरही आपण सगळ्यांनी पाहिला.
पण या मस्ती मागे एक सीक्रेट दडलेलं होतं ज्याचा खुलासा रणबीरनं केला. तो म्हणाला की,''या गाण्याचं शूटिंग तब्बल ८ दिवस चाललं होतं आणि गाणंच इतकं मस्तीवालं होतं की ते शूट करताना खूप मजा यायची कारण शूटिंगच्या आधी आम्ही चारही स्टार्स थोडी थोडी भांग देखील प्यायचो''.
हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
या गाण्याशी जोडलेला एक किस्सा आहे. या गाण्याच्या शूटिंगसाठी एक मोठा टॅंक बनवला गेला होता,जो पाण्यानं भरला होता. यासंदर्भात दीपिका,कल्किला काहीच माहित नव्हतं पण आदित्य आणि रणबीरला सगळ्याची कल्पना होती.
शूटिंगसाठी जेव्हा दोन्ही अभिनेत्री तयार होऊन आल्या तेव्हा आदित्य आणि रणबीरनं यांना उचलून टॅंकमध्ये बुडवलं. आणि त्यांच्या ओरिजनल एक्सप्रेशन्स रेमो डिसूझानं कॅमेऱ्यात कॅप्चर केल्या आणि ज्यानंतर हे फूटेज मूळ गाण्यातही वापरलं गेलं.
गाणं सुपरहिट झालं. आजही होळीच्या पार्टीत या गाण्याला मोठी डीमांड असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.