Avtar 2: २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या जेम्स कॅमरूनच्या 'अवतार' सिनेमानं संपूर्ण जगात आपल्या नावाचा गाजावाजा केला होता. आता या सिनेमाचा २ भाग म्हणजे 'अवतार: वे ऑफ वॉटर' आपल्या भेटीस येत आहे,ते देखील तब्बल १३ वर्षांनी. या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांना १३ वर्ष वाट पहावी लागली. आता जेम्स कॅमरून आपल्या 'अवतार' सिनेमाच्या सीक्वेलसाठी पूर्णपणे सज्जा झालेयत. प्रेक्षकांमध्ये 'अवतार: द वे ऑफ वॉटर' विषयी भरपूर क्रेझ पहायला मिळते आहे.(Avtar 2 Know why it took james cameron 13 years to make the film said this is the big reason actar the way of water)
जेम्स कॅमरून दिग्दर्शित 'अवतार' हा सिनेमा २००९ मधील हॉलीवूडचा सगळ्यात अधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. चाहत्यांना खूप वर्षांपासून या सिनेमाची प्रतिक्षा होती. पण आता ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. पण सगळ्यांच्या मनात एक प्रश्न मात्र होता तो म्हणजे जेम्स कॅमरून यांना अखेर सिनेमा बनवायला इतका वेळ का लागतो. सिनेमा १६ डिसेंबरला रिलीज होत आहे आणि दिग्दर्शकानेही आता या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय म्हणालेयत जेम्स कॅमरून.
हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
जेम्स कॅमरून बोलले, ''मी खूप वर्ष आधीपासून या प्रश्नांचा सामना करत आलोय,मी अवतार पार्ट १ बनवून थांबणार की याचा दुसरा भागही बनवणार?'' पुढे कॅमरून म्हणाले,''अवतारचा पहिला भाग हा एक असा सिनेमा होता जो लोकांना केवळ एका झाडासाठी रडायला मजबूर करतो. पण याच्या दुसऱ्या भागात बराच मोठा बदल आहे ज्या कारणानं मला हा सिनेमा बनवायला खूप वर्ष लागली. सध्या लोक रागात आहेत त्यामुळे आमच्या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही लोकांचे समाधान होईल असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही या सिनेमाला वेगवेगळ्या काळात यासाठी दाखवलं कारण ज्या गोष्टी २००९ मध्ये लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आवश्यक होत्या त्या आता महत्त्वाच्या नाहीत''.
जेम्स कॅमरून पुढे म्हणाले,''फिल्म निर्माता म्हणून फक्त सिनेमा बनवायला पैसे लावायचे एवढीच भूमिका आता राहिलेली नाही तर त्या माध्यमातून लोकांना समाधान कसं मिळेल हा विचार करणं देखील आता निर्मात्यासाठी महत्त्वाचं आहे''.
माहितीसाठी इथं थोडक्यात सांगतो की, जेम्स कॅमरूनच्या 'अवतार'चा पहिला भाग २००९ मध्ये रिलीज झाला होता. आणि त्याचा सीक्वेल 'अवतार- द वे ऑफ वॉटर' १३ वर्षानंतर १६ डिसेंबरला रिलीज होत आहे. सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग जगभरात सुरू झाली आहे. भारतात याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. भारतातही याचं अॅडव्हान्स बुकिंग चांगलं झालं आहे. 'अवतार-द वे ऑफ वॉटर' हा भारता इंग्रजी भाषेव्यतिरिक्त हिंदी,तामिळ,तेलुगू,कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.