Amber Heard: पतीकडून केस हारली, 'आता म्हणे, तुझ्यावर नेहमीच माझं प्रेम'!

पायरेट्स ऑफ कॅरेबियनमध्ये जॅक स्पॅरोची भूमिका केलेल्या जॉनी डेपला कुणी विसरु शकत नाही.
Amber Heard
Amber Heardesakal
Updated on

Johny Depp Vs Amber Heard: पायरेट्स ऑफ कॅरेबियनमध्ये जॅक स्पॅरोची भूमिका केलेल्या जॉनी डेपला कुणी विसरु शकत नाही. प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणून जॉनीचं नाव घ्यावं लागेल. जगातील सर्वाधिक प्रभावित (Hollywood News) करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत जॉनी डेपचे नाव घ्यावे लागेल. हॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या पंक्तीत जॉनीचं नाव आहे. (Social media viral news) श्रीमंती त्याच्या पायाशी लोळण घेत असताना त्याच्याबाबत एक मोठी घटना घडली. ती म्हणजे त्याच्या पत्नीनं एंबर हर्डनं जॉनीवर मानसिक आणि छळाचा आरोप केला. साऱ्या जगानं त्या केसची सुनावणी (Entertainment news) लाईव्ह पाहिली. त्याच्यानंतर जे घडलं हे कुणापासून लपून राहिलेलं नाही.

एंबर हर्डनं जॉनीवर जे आरोप केले होते ते अतिशय गंभीर होते. जेव्हापासून (Hollywood actors) कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली तेव्हापासून जॉनची मोठ्या प्रमाणात नाचक्की होऊ लागली होती. एंबरनं एका मासिकामध्ये जॉनीचे नाव न घेता त्याच्यावर आरोप केले होते. त्यामुळे जॉनीनं देखील आपल्यावरील आरोप कसे खोटे आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध केले आणि एंबर हर्डच्या विरोधात खटला दाखल केला होता. तो जिंकलाही. एंबर ही एका मानसिक आजारानं त्रस्त असल्याचे यावेळी दिसून आले. त्यामुळे त्यात जॉनीची बदनामी झाल्याचे कोर्टाचे म्हणणे होते.

या साऱ्या प्रकरणात जॉनीनं बाजी मारली असून आता त्याच्यावर सोशल मीडियातून त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यासगळ्यात एंबरनं मात्र त्याला दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. एंबरनं भलेही ही केस हारली असेल मात्र तिच्या त्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांना जिंकुनं घेतलं आहे. आपण अजुनही तुझ्याच प्रेमात असल्याचे एंबरनं म्हटले आहे. पतीनं केस जिंकल्यानंतर पत्नीला सुचलं शहाणपण असं म्हणून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Amber Heard
Vikram: विक्रमच्या सक्सेस पार्टीत सलमानची हजेरी ! सोशल मीडियावर फोटो वायरल

एका मुलाखतीमध्ये एंबरनं (Amber Heard) आपण अजुनही जॉनीच्या प्रेमात असल्याचे म्हटले आहे. एंबरनं एनबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, माझ्या नात्याला मी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. मी शेवटच्या दिवसांपर्यत माझ्या शब्दावर ठाम होते. जॉनीच्या वकिलानं ज्युरीचं दुसऱ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. असं म्हटलं आहे.

Amber Heard
Squid Game: स्क्विड गेम्सचा 'रियॅलिटी शो', बक्षीसाची रक्कम ऐकून बसेल धक्का!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.