Hollywood: अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे,ते त्याचं ट्वीटर अकाउंट सस्पेंड केल्या कारणानं. आता त्यानं ट्वीटरचा नवा मालक एलॉन मस्कवर निशाणा साधत,त्याला चक्क 'हाफ चायनीज' म्हणून संबोधलं आहे. या दोघां दरम्यान वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा काही दिवसांपूर्वी कान्येनं आपल्या ट्वीटमध्ये एडॉल्फ हिटलर आणि नाजियोंची प्रशंसा केली होती. हे ट्वीट लोकांना भडकऊ शकतं याकारणानं कान्येच्या ट्वीटर अकाउंटला सस्पेंड केलं गेलं. आता यावरनं कान्येनं एलॉन मस्कवर आपला राग व्यक्त केला आहे.(Hollywood news kanye west take a dig on elon musk call him half chinese after his twitter account suspended)
ट्वीटर अकाउंट सस्पेंड केल्यानंतर कान्ये वेस्टनं एलॉन मस्कला चांगलेच सुनावले आहे. त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे,'' मी एकटाच असा आहे का,जो विचार करतोय की एलॉन मस्क हाफ चायनिज आहे? तुम्ही कधी त्याचा लहानपणीचा फोटो पाहिला आहेत का? एका चायनीजला एका साऊथ आफ्रिकन सुपर मॉडेल सोबत एकत्र करा आणि आपल्याकडे एक एलॉन आहेच''.
हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
Kanye West ने पुढे लिहिलं आहे,''मी एक एलॉन म्हणतोय... पण त्यानं कदाचित त्याच्यासारखेच १० ते ३० एलॉन बनवले असतील. तो जेनेटिक हायब्रिड आहे....ओबामांना विसरू नकोस...'', काय काय लिहिलंय कान्येनं आपल्या ट्वीटमध्ये मस्क विरोधात. बातमीत लिंक जोडलीय,एकदा नजर फिरवा त्यावरनं म्हणजे कान्येचा संताप लक्षात येईल. कान्ये पुढे असं देखील म्हणाला की,''चर्च मध्ये अपशब्द वापरण्याबद्दल मला खेद आहे,पण माझ्याजवळ ओबामांसाठी दुसरा शब्द नाही सध्या डोक्यात. कान्येनं लिहिलं. YE24 चला संघटीत व्हा आणि LUAFO चा शोध घ्या''.
कान्येच्या हाफ चायनीज जेनेटिक हायब्रिड वाल्या वक्तव्यावर एलन मस्कने देखील पलटवार केला आहे.त्यानं एका ट्वीटवर उत्तर देत लिहिलं आहे की, ''मी याला कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो''. यानंतर कान्येनं मस्कच्या पोस्टला इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलं की,''मी जे लिहिलं त्याला प्रशंसाच समज माझ्या मित्रा...''
माहितीसाठी थोडक्यात इथे सांगतो की माइक्रोब्लॉगिंग साइटच्या नियमांनुसार आपल्या ट्वीटच्या माध्यमातून हिंसा घडेल असं वक्तव्य करणाऱ्या कान्ये वेस्टवर ट्वीटरनं बंदी आणली आहे, हे पहिल्यांदाचा घडलेलं नाही. याआधी देखील Anti-Semetic कमेंट केल्या कारणानं त्याला तंबी मिळाली होती. काही काळासाठी त्याचं अकाउंट बंदही केलं होतं. ट्वीटरचे नवीन CEO एलॉन मस्क यांनी २ डिसेंबर रोजी ट्वीटरवर कान्येचं अकाउंट सस्पेंड केल्याचं सांगितलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.