इतिहासजमा झालेली पैठणी आज जगात गाजतेय.. 'होम मिनिस्टर'आलं आणि...

४०० वर्षांचा इतिहास असणारी पैठणी जवळजवळ लयाला गेली होती. पण इकडे 'होम मिनिस्टर' सुरु झालं आणि तिकडे ग्राहकांची गर्दी झाली.
home minister paithani
home minister paithani sakal
Updated on

पैठणी. महाराष्ट्राच्या प्रत्येक स्त्रीचा एक हलवा कोपरा. आपल्या कपाटात पैठणी असावी यासाठी प्रत्येक बाई काडीकाडी एक करून पैसे साठवत असते. ही साडी म्हणजे आता महिलांमध्ये असलेली क्रेझ झालीय. पण हे सगळं कधीपासून झालं... याचाही विचार होणं गरजेचं आहे. साधारण १७ - १८ वर्षांपूर्वी हे चित्र पालटलं. पण त्या आधी नेमकी काय परिस्थिती होती पैठणीची... (paithani)

home minister paithani
बारामतीत रंगला होम मिनिस्टर कार्यक्रम

पैठणीचा इतिहास तसा जुना आहे. पैठणी बनवणारे विणकरी सांगतात अंदाजे ४०० ते ५०० वर्ष जुनी ही साडी आहे. आताच्या मशिनरीच्या जमान्यातही ही साडी हातमागावर विणत असल्याने त्याची किंमत इतर साड्यांपेक्षा चार पैशाने जास्तच. कदाचित सामान्यांना न परवणारी. शिवाय ही साडी म्हणजे एक प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं. त्यामुळे या साडीला अत्यंत कमी मागणी असायची. (paithani history)

home minister paithani
दिव्यांग कलाकारांनी विणलीय ११ लाखांची पैठणी.. अजूनही सुरु आहे काम..

इथले व्यावसायिक सांगतात, व्यवसाय बुडाल्याने २००० सालच्या दरम्यान कित्येक कार्यशाळा बंद झाल्या. लोकांनी व्यवसायाचे इतर पर्याय स्वीकारले. विणकरी गाव सोडून गेले. आणि अजून काही वर्षांनी पैठणी निर्मितीला टाळे लागेल की काय अशी अवस्था झाली होती. व्यवसाय जितका सुरु होता त्याच्या निम्म्याहून खाली आला होता. कित्येकांना ही साडी म्हणजे नेमका काय प्रकार आहे हेही माहित नव्हते. या व्यवसायात अत्यंत चिंतेचे वातावरण असताना एके दिवशी एक चमत्कार झाला आणि हा बंद पडलेला व्यवसाय गिरणीच्या वेगात धावू लागला. (yeola paithani)

घरच्या गृहिणींचा सन्मान करणारी 'होम मिनिस्टर' (home minister) ही मालिका 'झी मराठी' वाहिनीने २००४ च्या दरम्यान प्रदर्शित केली आणि बघताबघता ही मालिका घराघरात पोहोचली. ही मालिका घराघरात पोहोचण्या मागचे एकमेव कारण म्हणजे 'आदेश बांदेकर'. (adesh bandekar) कारण मराठी मालिका विश्वात प्रत्येक वाहिनीने अशा मालिका सुरु करून पहिल्या पण १८ वर्षे अविरत सुरु असलेली ही एकमेव मालिका ठरली. हास्य , विनोद, कोपरखळ्या, थट्टा आणि संपूर्ण कुटुंबाला साधणारे निवेदन अशी हि शैली जाणून आदेश बांदेकरांनाच जमावी. त्यांच्या अमोघ वाणीने ते महाराष्ट्राचेच नाही तर अवघ्या जगाचे 'भाऊजी' झाले. आजतागायत त्यांनी ५००० हुन अधिक वाहिनींचा सन्मान केला आहे.

home minister paithani
११ लाखांची पैठणी जिंकण्यासाठी तयार ना? काय आहे खासियत?

या सन्मानात विजेत्या वहिनींना 'पैठणी' साडी दिली जाते. ही पैठणी म्हणजे कित्येक कुटुंबांना परवडणारी नाही. पण होम मिनिस्टर मुळे ती घराघरात पोहोचली. कित्येक स्त्रिया ही पैठणी सहज विकत घेऊ शकतात पण आम्हाला ती होम मिनिस्टर मध्येच मिळावी अशी एक धारणा होऊ लागली. थोडक्यात काय तर चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक स्त्रीला या पैठणीचे वेड लागले. बघताबघता या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाखो महिलांनी पत्रं लिहिली पण प्रत्यक्ष सहभागी होण्याचे भाग्य क्वचितच काहींना मिळाले. मग काय महिला गप्प बसतात होय. त्यांनी थेट दुकानात झडप घातली आणि पैठणीची मागणी होऊ लागली.

बघता बघता मुंबई, पुणे आणि सगळीकडेच्या दुकानांमध्ये पैठणी सजू लागल्या. आमच्याकडे खास पैठणी मिळेल अशी जाहिरात झळकू लागली. याचा परिणाम थेट नाशिकच्या येवल्यात झाला. जिथे ही पैठणी तयार केली जाते. पूर्वी ही पैठणी पैठणमध्ये तयार केली जायची असे म्हणतात पण तिथले विणेकरी स्थलकाल परत्वे नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यात स्थायिक झाले आणि तिथेच ही पैठणी नांदली. पण मागणी नसल्याने कालानुरूप पैठणी इतिहासजमाही होऊ लागली. आता हा व्यवसाय बंद पडणारअसे वाटत असतानाच अचानक मागणी वाढली. मुंबईच्यापासुन हे गाव तसे दूर असल्याने तिथल्या विणकऱ्यांना याबाबत काही कल्पना नव्हती. पण अचानक एवढी मागणी कशी वाढली याचा शोध इथल्या व्यावसायिकांनी घेतला तेव्हा त्यांना 'होम मिनिस्टर' ची मेख कळली.

आज याच मालिकेमुळे इथला व्यवसाय सातासमुद्रापार गेला. पर्यटक भेट देऊ लागले. व्यवसायाला गती आली. जे व्यावसायिक कर्जबाजारी झाले होते त्यांच्या दारात आज चार चाकी गाड्या आहेत. या बदलासाठी हे व्यावसायिक कायमच होम मिनिस्टरच्या ऋणात आहेत. एकेकाळी केवळ खत्री, कोष्टी, साळी समाजकडून विणली जाणारी पैठणी आज अनेकांच्या रोजगाराचे साधन बनली. गावाच्या विकासाचे साधन बनली. आज याच गावात 'होम मिनिस्टर' साठी चक्क सोन्याची ११ लाखांची पैठणी तयार होत आहे. उन्हात झर्रकन सावली यावी असा काळ या गावाने पाहिला आहे. कदाचित ही सोन्याची पैठणी येवले गावाच्या सुवर्ण युगाची नांदीच म्हणावी लागेल...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()