House of the Dragon Review: 'गेम ऑफ थ्रोन्स' शेर तर 'हाऊस ऑफ ड्रॅगन....'

वेबमालिकेच्या दुनियेत ज्या वेबसीरिजची नावं ही नेहमीच घेतली जातात त्यात गेम ऑफ थ्रोन्सचे नाव सगळ्यात पहिल्यांदा येते.
House of the Dragon Review
House of the Dragon Reviewesakal
Updated on

House of the Dragon Review: वेबमालिकेच्या दुनियेत ज्या वेबसीरिजची नावं ही नेहमीच घेतली जातात त्यात गेम ऑफ थ्रोन्सचे नाव सगळ्यात पहिल्यांदा येते. सध्याच्या ओटीटीच्या जमान्यात कुणी गेम ऑफ थ्रोन्स पाहिली नाही असे होणार (Tv Entertainment News) नाही. इतकी ही मालिका लोकप्रिय झाली. त्याच्या आठही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आठ वेगवेगळी घराणी, त्यांचा आपआपसातला संघर्ष, मानवी मुल्यं, संस्कृती यांचे विलक्षण चित्रण या (Game Of Thrones) मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवता आले. आर आर मार्टिन लिखित कादंबरीवर आधारित गेम ऑफ थ्रोन्स मालिकेची भुरळ जगभरात सगळीकडे होते. मनोरंजन विश्वातील बहुतांशी पुरस्कार या मालिकेनं आपल्या नावावर केले होते.

पुन्हा गेम ऑफ थ्रोन्सची चर्चा होण्याचे कारण म्हणजे या मालिकेचा प्रीक्वेल हाऊस ऑफ ड्रॅगन्स आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तो देखील प्रेक्षकांच्या पसंतीला पडल्याचे दिसून आले आहे. ओटीटीवरील डिझ्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. उच्च निर्मितीमुल्य, लक्षवेधी ग्राफीक्स, जबरदस्त अॅक्शन, प्रभावी साउंड आणि कॅमेरा योजना यामुळे ही मालिका सध्याच्या घडीला टॉप सीरिजच्या यादीत अग्रस्थानी आहे. खासकरुन यंग क्राऊडसाठी ही मालिका बेस्ट वॉचिंग ऑप्शन असल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा या मालिकेचा ट्रेलर आला होता तेव्हा पासून त्याच्या प्रदर्शनाचे चाहत्यांना वेध लागले होते.

हाऊस ऑफ ड्रॅगन्सविषयी सांगायचे झाल्यास गेम ऑफ थ्रोन्स शेर असेल तर त्याचा प्रिक्वेल हा सव्वाशेर आहे. दिग्दर्शकानं केलेली वातावरण निर्मिती कौतूकास्पद आहे. गेम ऑफ थ्रोन्स पाहताना जो वेगळ्या प्रकारचा माहोल तयार होत होता तोच हाऊस ऑफ ड्रॅगन पाहताना आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट आहे. टायगेरियन घराण्याची. राजा व्हिसरीज टायगॅरीजला कुणीही वारस नाही. त्यामुळे त्यानं त्याच्या भावाला डेमन टायगॅरियनला सिंहासन बहाल केलं आहे. इथून पुढे खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. तो काय आहे, त्याचे होणारे परिणाम काय आहेत, गेम ऑफ थ्रोन्सची नेमकी बीज या भागात कशाप्रकारे रोवली गेली हे जाणून घेण्यात रस असणाऱ्यांसाठी हाऊस ऑफ थ्रोन्स बेस्ट ऑप्शन आहे.

House of the Dragon Review
House of the Dragon Review

हाऊस ऑफ ड्रॅगनमध्ये आपल्याला गेम ऑफ थ्रोन्सच्या दोनशे वर्ष अगोदर काय झाले हे पाहायला मिळते. डेमन टायगॅरियनला मिळालेली सत्ता तो आपली मुलगी रेनेरा टायगॅरियनला देतो. खरं तर ती त्याची अधिकारी आहेच मात्र यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. त्यामुळे अनेकांना तिच्याविषयी असुया आहे. त्यानंतर लढ्याला सुरुवात होते. मोठा संघर्ष यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय प्रभावीपणे दिग्दर्शक सादर करतो. त्यासाठी त्याला धन्यवाद द्यायला हवेत. गेम ऑफ थ्रोन्समध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक भागाची उत्सुकता ताणली गेली आहे त्याप्रमाणे हाऊस ऑफ ड्रॅगन्समध्ये देखील दिसून येते. ही त्याचे मुख्य वैशिष्ट्य सांगता येईल.

आयर्न थ्रोन मिळवण्यासाठीचा संघर्ष कोणत्या वळणावर येवून ठेपतो, त्यासाठी कोण कशाप्रकारे मुत्सदीपणा करतो, हे पाहण्यासाठी हाऊस ऑफ द ड्रॅगनच्या वाट्याला जावं लागेल. या सीरिजचा पहिला भाग तर कमालीचा उत्कंठावर्धक झाला आहे. त्याचे दमदार व्हिएफएक्स हे आपल्याला चकीत करतात. थोडासा अॅडल्ट कंटेट जरुर यात आहे मात्र तो त्या कथेचा भाग म्हणून आला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याचे लार्जर दॅन लाईफ असे सेट्स ते पाहून आपण प्रभावित होतो. ज्यांनी गेम ऑफ थ्रोन्स पाहिला आहे त्यांना ही मालिका नक्कीच आवडेल यात शंका नाही. ज्यांनी पाहिली नाही त्यांनी थोडासा पेशन्स ठेवल्यास त्यांनी निराशा होणार नाही याची काळजी दिग्दर्शकानं घेतली आहे.

House of the Dragon Review
House of the Dragon Review
House of the Dragon Review
Liger Twitter Review: लायगरचा बार 'फुसका'! प्रेक्षकांची नाराजी

हाऊस ऑफ ड्रॅगनच्या पहिल्या सीझनमधील पहिला भाग हा 21 ऑगस्टला प्रदर्शित झाला असून त्याचा दुसरा भाग हा 28 ऑगस्टला तर तिसरा भाग 4 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागाचं चाहत्यांनी तोंड भरुन कौतूक केलं आहे. त्यांना आता दुसऱ्या भागाचे वेध लागले आहेत.

* हाऊस ऑफ ड्रॅगन - सीझन 1

दिग्दर्शक - मिगेल सोफोचिनेक, ग्रेग येयानटेनेस

रेटिंग - ***1/2

House of the Dragon Review
Liger: टायसनने देवरकोंडाला दिल्या इंग्रजीतून शिव्या, विजय म्हणतो...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.