jeetendra Birthday: 'या'अभिनेत्रीने धुडकावून लावला होता जितेंद्र यांचा लग्नाचा प्रस्ताव.. आणि मग..

आज जितेंद्र यांचा वाढदिवस, त्या निमित्ताने हा खास किस्सा..
how Jeetendra had proposed to Hema Malini and she rejected birthday special story
how Jeetendra had proposed to Hema Malini and she rejected birthday special storysakal
Updated on

Jeetendra Birthday: 'ताकी ओ ताकी.. ओ ताकी ताकी रे.. जबसे तू आंखमें झाकी' हे गाणं माहीत नाही असं कुणी नाही. हे गाणं त्यातील संगीतामुळे जितकं हीट झालं तितकंच हीट झालं ते अभिनेते जितेंद्र यांच्यामुळे..

जितेंद्र हे नाव असं आहे की एकेकाळी त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते अक्षरशः वेडे व्हायचे. तरुण, रुबाबदार आणि डॅशिंग अशा या हीरोला तेव्हा कोणताही सोशल मीडिया नसताना लाखोंची पसंती होती. जितेंद्र यांच्या सोबत काम करण्यासाठी कलाकारही एका पायावर तयार असायचे.

अशा या अभिनेत्याचा आज वाढदिवस. आज ते आपला ८१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने जाणून घेऊया एक खास बात..

(how Jeetendra had proposed to Hema Malini and she rejected birthday special story)

how Jeetendra had proposed to Hema Malini and she rejected birthday special story
Santosh Juvekar: हा असच बोलतो आणि आम्ही तापतो आणि मग.. संतोष आणि कुशाचा भन्नाट व्हिडिओ..

मध्यंतरी एक पुस्तक प्रदर्शित करण्यात आले होते. या पुस्तकामध्ये हेमा मालिनी आणि जितेंद्र हे लग्न करणार होते, असा उल्लेख करण्यात आला आहे. असं म्हणतात की जितेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते, त्यांना हेमाशी लग्न देखील करायचे होते. म्हणून त्यांनी थेट हेमा मालिनी त्यांना लग्नाची मागणी घातली, पण हेमा यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावला.

हेमा यांच्या मनात जितेंद्र विषयी केवळ मैत्रीचे भाव होते कारण त्यांचे खरे प्रेम धर्मेंद्र यांच्यावर होते. असं म्हणतात हेमा आणि जितेंद्र यांच्या घरच्यांनी त्यांचे लग्नं लावून देण्याचाही विचार केला होता होता. धर्मेंद्र यांनी तसे होऊ दिले नाही.

त्यानंतर जितेंद्र यांनी त्यांची बाल मैत्रिण शोभा कपूर यांच्याशी विवाह केला. यांना दोन अपत्य आहेत, एक तुषार कपूर जो आज हिंदी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता आहे, तर दुसरी मुलगी एकता कपूर जी बालाजी प्रॉडक्शन्सच्या अंतर्गत अनेक मालिकांची निर्मिती करते.

जितेंद्र यांनी दोनशेहून अधिक हिंदी चित्रपट केलेले आहेत. त्यांनी 80 हुन अधिक दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्ये परत बनवण्याचा विक्रम केलेला आहे, यातील बहुतांशी सिनेमे तेलगू सुपरस्टार कृष्णा यांचे होते. कृष्णा आणि जितेंद्र हे दोघेही चांगले मित्र म्हणून ओळखले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.