Angelo Mathews: आयुष्यात एकेक मिनिट महत्वाचा आहे बाबा.. मराठी अभिनेत्याने मॅथ्यूजला सांगितला शहाणपणाचा धडा

मराठी अभिनेता हृषिकेश जोशीने मॅथ्युजच्या टाईमआऊटवर भाष्य केलंय
hrishikesh joshi comment on angelo mathews incident happend in srilanka vs bangladesh wc 2023 match
hrishikesh joshi comment on angelo mathews incident happend in srilanka vs bangladesh wc 2023 match SAKAL
Updated on

Hrishikesh Joshi on Angelo Mathews: काल क्रिकेट वर्ल्डकप 2023 मध्ये अजब घटना घडलीय. अ‍ॅंजेलो मॅथ्युज बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यात टाईमआऊट झाला. त्यामुळे क्रिकेटविश्वात बरीच चर्चा रंगली आहे. अनेक तज्ञ आणि जाणकार मंडळी यासंदर्भात भाष्य करत आहेत.

अशातच अभिनेता हृषिकेश जोशीने या प्रकरणासंबंधी फेसबुकवर लांबलंचक पोस्ट केलीय. हृषिकेश जोशींनी सोशल मीडियावर अ‍ॅंजेलो मॅथ्युजचं उदाहरण देत थेट ट्रॅफिक नियमांवर बोट ठेवलंय.

hrishikesh joshi comment on angelo mathews incident happend in srilanka vs bangladesh wc 2023 match
Vaibhav Managle: "कृपया फटाके फोडून प्रदुषण करु नका": नेटकऱ्यांनी दिला गाझाला जाण्याचा सल्ला...

हषिकेश जोशी लिहीतात, "आउट होण्याचे 10 प्रकार आहेत त्यातले 9 आपण बघितलेत पण 10व्या नियमाचं उदाहरण कधी बघायला मिळालं नव्हतं. तो पोर्शन आज अँजेलो मॅथ्यूजने पूर्ण केला. हा खेळायला आला आणि हेल्मेटचा बेल्ट लावण्यात वेळ गेला, मग दुसरं मागवलं यात एकही बॉल न खेळता 3 मिनिटं गेली आणि त्याला TIME OUT या नियमात आउट दिले गेले... अँजेलो, अरे येतानाच चांगलं हेल्मेट घालून यायचं रे.... "

हषिकेश जोशी पुढे लिहीतात, "आयुष्यात एकेक मिनिट किती महत्वाचा आहे बाबा... आधीच अनेक गावांत हेल्मेट घालत नाहीत, त्यात मुंबईसारख्या शहरात तर पोलीस हमखास पकडतात.. पण 100/200 ची पावती किंवा ऑनलाइन दंड भरून तुमची गाडी जाते तरी पुढं.. पण तुझी ही पावती केवढ्याला फाटली बघ... एकही बॉल न खेळता सिंहली भाषेत शिव्या देत देत आधीच खराब असलेलं तुझं हेल्मेट रागाच्या भरात फेकून द्यावं लागलं तुला.. यातून काय धडा मिळतो की,

1)वेळेचं पालन हा असाही हास्यास्पद विषय ठरतो आणि

2) बाहेर पडताना हेल्मेट आधीच चेक करून बाहेर पडणे.

#वाहतुक नियंत्रण, मुंबई पोलीस.. यांना समर्पित"

शकीब अल हसनच्या एका निर्णयाने मॅथ्युज न खेळताच आऊट

दरम्यान काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या १४६ वर्षांमध्ये प्रथमच एखाद्या क्रिकेटरला 'टाइम आऊट' घोषित करण्यात आले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात ही घटना घडली.

श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'टाईम आऊट' झालेला पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. बांग्लादेश संघाचा कर्णधार शकिब अल हसनच्या अपीलवर पंचांनी हा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.