Fighter Movie: रिलीजआधीच हृतिकचा 'फायटर' अडकला सेन्सॉरचा कात्रीत, करणार हे मोठे बदल?

हृतिक रोशनच्या 'फायटर'मध्ये सेन्सॉरने सुचवले हे मोठे बदल
hrithik roshan deepika padukon starrer fighter changes by cbfc
hrithik roshan deepika padukon starrer fighter changes by cbfcSAKAL
Updated on

Fighter Movie News: दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनचा आगामी चित्रपट 'फायटर' रिलीजसाठी सज्ज आहे. रिलीजपुर्वीच 'फायटर' विविध कारणांनी चर्चेत आहे. सिनेमातली गाणी अन् हृतिक - दीपिकाच्या केमिस्ट्रीची खुप चर्चा आहे.

अशातच 'फायटर'ला सेन्सॉरने रिलीजपूर्वी CBFC कडून U A प्रमाणपत्र देखील दिलं आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला मंजुरी दिली. पण त्यांनी काही बदल करण्यास सांगितले आहे.

hrithik roshan deepika padukon starrer fighter changes by cbfc
Kiran Mane: "सगळ्या जातीच्या बहुजन सहकार्‍यांसह जाऊन महापुजा करुन...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत

काय बदल आहेत?

अहवालानुसार, CBFC ने 'फायटर'मधील इंटिमेट सीन्स काढून टाकण्याची आणि काही आक्षेपार्ह शब्द म्यूट करण्याची विनंती केली आहे. याशिवाय सेन्सॉर बोर्डाने हिंदीमध्ये धूम्रपान विरोधी संदेश समाविष्ट करण्यास सांगितले आहे. या बदलांनंतर चित्रपटाला 19 जानेवारी रोजी U/A प्रमाणपत्र देण्यात आले.

'फायटर' चित्रपटाचा रनटाइम 2 तास 46 मिनिटांचा आहे. दीपिका, हृतिक आणि अनिल कपूर स्टारर 'फायटर' हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. यामध्ये तिन्ही मुख्य कलाकार एअरफोर्स ऑफिसर्सच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'फायटर'ची अॅडव्हान्स बुकींग

तरण आदर्श यांच्या अहवालानुसार, पहिल्याच दिवशी फायटरची आगाऊ बुकिंग 2 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारतात पहिल्याच दिवशी फायटरची ८८,१९० तिकिटे विकली गेली आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, यूपी, तेलंगणा, कर्नाटकमध्ये सर्वाधिक तिकिटे विकली गेली आहेत. आगाऊ तिकिटांमध्ये हा चित्रपट लवकरच 3 कोटींचा गल्ला गाठणार असल्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.