Fighter Movie : 'तुम्हाला नेहमीच...', टॉम क्रुझच्या 'टॉप गन'सोबत 'फायटर' ची तुलना होताच दिग्दर्शक सिद्धार्थ संतापले!

ज्यांनी हॉलीवूडच्या टॉम क्रुझचा टॉप गन पाहिला असेल त्यांना हृतिकच्या फायटरचे विशेष कौतुक वाटणार नाही.
Fighter Compare to Tom Cruise Top Gun Director Reaction
Fighter Compare to Tom Cruise Top Gun Director Reaction esakal

Fighter Compare to Tom Cruise Top Gun Director Reaction : ज्यांनी हॉलीवूडच्या टॉम क्रुझचा टॉप गन पाहिला असेल त्यांना हृतिकच्या फायटरचे विशेष कौतुक वाटणार नाही. आता यात टॉमच्या अन् हृतिकच्या फायटरची तुलना होणार नाही. हॉलीवूडमधील व्हिएफएक्स, ग्राफीक्स, साऊंड डिझाईनिंग, सिनेमॅटोग्राफी अॅक्शनपटांच्या बाबत अनेकदा सरस ठरताना दिसतात. Fighter Compare to Tom Cruise Top Gun Director Reaction

हृतिकचा फायटर हा उद्या देशभरात प्रदर्शित होतो आहे. त्याचा ट्रेलर हा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यानंतर त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले. त्यावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये अनेकांनी हृतिकचा फायटर आणि टॉम क्रुझच्या टॉप गनची तुलना होऊ लागली. त्यामुळे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे.

फायटरमध्ये सगळे एरियल सीन्स आहेत. त्यामुळे जेव्हा त्याचा ट्रेलर समोर आला तेव्हा नेटकऱ्यांना टॉमच्या टॉप गनची आठवण झाली. यावर दिग्दर्शक यांनी आता आपल्या चित्रपटांचे कौतुक करा. नेहमीच हॉलीवूड चित्रपटांची तुलना बॉलीवूड पटांशी करुन कमी लेखण्याचा प्रयत्न करु नका. अशा शब्दांत सिद्धार्थ आनंद यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

हृतिक, दीपिका, अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या फायटरची अॅडव्हान्स बुकींगही जोरात सुरु झाली आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हृतिक आणि दीपिका हे पहिल्यांदाच एकत्रित काम करताना दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या या चित्रपटाची उत्सुकता आहे. त्या दोघांनी वायुसेना अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

पुलवामा हल्ला यावर आधारित फायटर ही एक अॅक्शन फिल्म असल्याचे सांगितले जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणात व्हिएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. सिद्धार्थ आनंद यांनी म्हटले आहे की, आपण आपल्या चित्रपटांचा आदर करायला शिकले पाहिजे. तसे आपल्याकडे होताना दिसत नाही. तुम्ही प्रत्येकवेळी हॉलीवूडच्या चित्रपटांसोबत आपल्या चित्रपटांची तुलना करणे बरोबर नाही. अशा शब्दांत सिद्धार्थ आनंद यांनी खंत व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com