मुंबई- सामान्य लोकांप्रमाणेच बॉलीवूडचे कलाकारही लॉकडाऊनचं पूर्णपणे पालन करताना दिसत आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ते चाहत्यांचा संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान अभिनेता हृतिक रोशनने सांगितलंय की तो २३ तास काहीही न खाता पिता राहिलाय. एवढंच बोलून हृतिक थांबला नाही तर त्याने याचं खास कारणंही त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
लॉकडाऊन असलं तरी हृतिक त्याच्या फिटनेसकडे जातीनं लक्ष देतोय. स्वतःला फिट ठेवण्यासाठी तो एक ना अनेक पर्यायांचा वापर करत आहे. हृतिकने नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्याने सांगितलं की तो २३ तास उपाशी आहे. हृतिकने या पोस्टसोबतंच त्याचा सेल्फी फोटोही शेअर केला आहे.
हा सेल्फी फोटो शेअर करताना त्याने माहिती दिली की, त्याने उपवास केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की २३ तासांचा उपवास. त्याने त्याच्या या सेल्फीसोबत एका ऍपचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे ज्यामुळे हृतिक फिट राहतो. हृतिक रोशनची ही पोस्ट सोशल मिडियामध्ये चांगलीच व्हायरल होत आहे. हृतिकच्या चाहत्यांना या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे. घरी असल्याने व्यायामासोबतंच फिट राहण्यासाठी त्याने आहारावर नियंत्रण म्हणून २३ तासांचा हा उपवास केला आहे.
याव्यतिरिक्त हृतिक काहीदिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांना मदत केल्यामुळे चर्चेत होता.याविषयीची माहिती त्याने स्वतः सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली होती. कोरोना व्हायरसमध्ये स्वतःचा जीव पणाला लावणा-या पोलिसांना मदत केल्याने मुंबई पोलिसांनी सोशल मिडियावर हृतिकचं कौतुक देखील केलं होतं.
हृतिक रोशन सध्या घरीच कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. विशेष म्हणजे हृतिक आणि सुझान यांचा घटस्फोट होऊनही दोघांना मुलांसोबत वेळ घालवता यावा यासाठी लॉकडाऊमध्ये एकत्र राहत आहेत. हृतिक त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत तर असतोच मात्र त्याहीपेक्षा वडिल राकेश रोशनही पन्नाशी पार केल्यांनतर तेवढेच फिटनेसकडे लक्ष देताना दिसून आले आहेत.
hrithik roshan has fast on 23 hrs for fitness
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.