Hrithik Roshan Troll: 'मी तुझा फॅन होतो पण..', 'जोधा अकबर' चं 15 वं वर्ष सेलिब्रेट करणं हृतिकला पडलं महागात

हृतिक रोशननं जोधा अकबर सिनेमाला रिलीज होऊन १५ वर्ष झाल्या निमित्तानं एक पोस्ट केली होती. ज्यावरनं त्याच्याच चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.
Hrithik Roshan_Aishwarya Rai In Jodha AKbar
Hrithik Roshan_Aishwarya Rai In Jodha AKbarGoogle
Updated on

Hrithik Roshan Troll: बॉलीवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायचा 'जोधा अकबर' रिलीज होऊन आता १५ वर्ष झाली आहेत. या खास क्षणी हृतिक रोशननं सिनेमाचा दिग्दर्शक आशुतोष गोवारिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच 'जोधा अकबर' सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

या सिनेमातील हृतिकच्या अभिनयाचं खूप कौतूक झालं होतं. सिनेमात ऐश्वर्या रायनं जोधाची भूमिका साकारली होती. सिनेमातील हृतिक-ऐश्वर्याची केमिस्ट्री देखील चाहत्यांना खूप आवडली होती.(Hrithik Roshan troll jodha akbar 15 years celebration post)

Hrithik Roshan_Aishwarya Rai In Jodha AKbar
Dharmendra: 'स्ट्रगलिंग अभिनेत्यासारखं का करताय..',युजरनं खिल्ली उडवताच भडकले ८७ वर्षाचे धर्मेंद्र,म्हणाले..

हृतिकनं जोधा अकबर सेटवरील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना ह्तिकनं लिहिलं आहे की-''आशुतोष गोवारिकर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 'जोधा अकबर'मध्ये मला सहभागी करुन घेतल्याबद्दल आणि मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी मी पात्र आहे हा विश्वास दाखवल्या बद्दल आपले खूप खूप आभार. तुमचं दिग्दर्शन आणि माझे इतर शानदार सहकलाकार या सर्व आठवणी कायम माझ्या स्मरणात राहतील''.

हृतिकनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्याच्यावर ट्रोलर्सनी निशाणा साधला आहे. वेगवेगळ्या कमेंट्स हृतिकच्या पोस्टवर पहायला मिळत आहेत. एकानं लिहिलं आहे की-'मी तुझा फॅन होतो,पण तू अकबरची भूमिका साकारून खूप मोठी चूक केलीस आणि तेव्हापासून तू माझ्या मनातून उतरलास'.

तर आणखी एका हृतिकच्या चाहत्यानं जोधा अकबरच्या प्रेम कहाणीला 'फेक' म्हटलं आहे. एका नेटकऱ्यानं तर अकबर खूप निर्दयी होता असं म्हटलं आहे.

Hrithik Roshan_Aishwarya Rai In Jodha AKbar
Sandeep Pathak: 'आपल्या देशाचं राजकारण हे..',संदीप पाठकची पॉलिटिकल कमेंट चर्चेत

थोडक्यात माहितीसाठी इथे सांगतो की,'जोधा अकबर' सिनेमात हृतिक रोशननं शहंशाह अकबरची भूमिका साकारली होती. जो शूर होताच पण तितकाच संवेदनशील राजा होता.

हृतिकनं अकबरची भूमिका साकारून आपल्या चाहत्यांवर अशी छाप सोडली होती की आजतागायत चाहत्यांच्या स्मरणात हृतिकनं साकारलेला अकबर आहे.

हा एक ऐतिहासिक सिनेमा होता,ज्यामध्ये जोधाच्या रुपात ऐश्वर्याला पाहून अनेकजण तिच्या सौंदर्याचे दिवाने झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.