महिला दिनी हृता दुर्गुळेच्या 'अनन्या' सिनेमाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

'अनन्या' या नाटकानं प्रेक्षकांची दाद मिळवली होती,आता सिनेमा कसा असेल यावर चर्चा रंगलीय.
Hruta Durgule
Hruta DurguleInstagram
Updated on

'अनन्या...कहाणी एका जिद्दिची,कहाणी एका संघर्षाची,कहाणी अन्यायाविरोधात आवाज पुकारणाऱ्या एका लढ्याची,कहाणी एका धाडसाची...' हो. एका सत्य घटनेवरनं प्रेरित आहे अनन्या(Ananya) सिनेमाची(Marathi Movie) कथा. हृता दुर्गुळे(Hruta Durgule) या सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या सिनेमाचं पोस्टर आज अखेर जागतिक महिला दिनाचं(International Women's Day) औचित्य साधत रीलीज करण्यात आलं. हृता दुर्गुळेनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'अनन्या' सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सिनेमाची टॅगलाईन आणि फोटो हे सध्या लक्षवेधी ठरत आहेत.

''शक्य आहे,तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे'' अशी सकारात्मक उर्जा देणारी टॅगलाईन सिनेमाची आहे. तर पोस्टरमध्ये हात नसलेली अनन्या पायानं तिचे केस विंचरतेय,ते ही चेहऱ्यावर सुंदरसं स्माइल ठेवून बरं का. हा सिनेमा १० जून,२०२२ रोजी सिनेमागृहात आपल्या भेटीस येत आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट,ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची जबाबदारी प्रताप कड यांनी उचलली आहे.

Hruta Durgule
मराठी मालिका विश्वातील टॉप 5 स्त्री व्यक्तिरेखा; नंबर 1 वर कोण?

या सिनेमाचा विषय हा आधी नाट्यरुपात रंगमंचावर आला आहे. यामध्ये ऋतुजा बागवेनं 'अनन्या' ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या नाटकाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. यात रंगमंचावर अपंग मुलीची व्यक्तिरेखा हुबेहूब साकारणाऱ्या ऋतुजा बागवेचं तिच्या अभिनयाबद्दल विशेष कौतूकही झालं होतं. त्यामुळे अर्थातच 'अनन्या' वर सिनेमा येतोय याविषयी लोकांमध्ये उत्सुकता पहायला मिळत आहे. त्यात आता पोस्टरमध्ये हृता दुर्गुळेला पाहून सिनेमाची चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमाविषयी मागे एका मुलाखतीत हृतानं म्हटलं होतं,''हा सिनेमा म्हणजे सकारात्मक उर्जेचा स्त्रोत आहे. आयुष्य सुंदर आहे,ते मनमुराद जगावं''.

Hruta Durgule
मुलीच्या जन्मानंतर आदित्य नारायणनं घेतला मोठा निर्णय;चाहते नाराज

तर रवी जाधव यांनी पोस्टर रिलीज केल्यावर आपल्या पोस्टच्या माध्यमातून लिहिलंय,''आज महिला दिनाच्या निमित्तानं पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या निमित्तानं सर्व महिलांचा सत्कार करत आहोत. तुमची इच्छाशक्ती प्रबळ हवी,महिलांना काहीच अशक्य नाही.आनंदान जगायला फक्त शिका..'' असो मोठ्या पडद्यावरही 'अनन्या'ला यश मिळो,अन् हृता दुर्गुळेनं साकारलेली 'अनन्या' प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करो या शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.