Movie Review: टेस्टिंगच्या नावाखाली माणसांच्या जीवाचा बाजार मांडणारा 'Human'

वैद्यकीय जगताचा आखो देखा हाल मांडणारी सीरिज म्हणून ह्युमन या मालिकेचा (Web Serise) उल्लेख करावा लागेल.
Human Serise
Human Serise
Updated on

Movie Review: वैद्यकीय जगताचा आखो देखा हाल मांडणारी सीरिज म्हणून ह्युमन या मालिकेचा (Web Serise) उल्लेख करावा लागेल. डॉक्टरांवर शंभर टक्के विश्वास ठेवून ते जसे म्हणतील त्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्ती उपचार घेतो. आपल्याला काहीही झालं तरी डॉक्टर आपल्याला वाचवतील ही आशा रुग्ण बाळगून असतो. (Bollywood News) मात्र दरवेळी तसं होतं असं नाही. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याचे दिसून आले होते. वैदयकीय सेवा, रुग्णांची होणारी लूट, यामुळे सर्वसामान्य रुग्ण वेठीस धरला जात होता. ह्युमन नावाच्या सीरिजमध्ये जीवघेण्या आजारांवर शास्त्रज्ञ ज्या लशींचा शोध लावतात त्या लशींची मानवी चाचणी, वैदयकीय धोरणं, त्यामागील राजकारण, डॉक्टरांकडून पैशांसाठी सर्वसामान्य रुग्णांच्या भावनाशी खेळण्याचा हिणकस प्रकार यामाध्यमातून समोर आला आहे.

मंथन सारख्या मोठ्या हॉस्पिटल्स सुरु करणाऱ्या डॉ. गौरी नाथ (शेफाली शहा) मोठ्या महत्वांकाक्षी आहेत. त्यांना आता भोपालमध्ये एलायझर नावाचं मोठं रुग्णालय सुरु करायचं आहे. जे अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असेल. डॉ.नाथ यांना मानवी सेवेसाठी झटणारं व्यक्तिमत्व म्हणून एका व्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीच्यावतीनं गुणगौरव करणारा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच आपला डॉ. नाथ यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच नाहीये. आपण ह्य़ुमचे एकापाठोपाठ एपिसोड पाहत जातो त्यानुसार आपल्याला मेडिकल क्षेत्रातील सत्य समजायला सुरुवात होते. डॉ. सायरा (कीर्ती कुल्हारी) नव्यानं मंथनचा भाग झाली आहे. तिलाही डॉ.नाथ यांनी आपल्या व्यक्तिमत्वानं प्रभावित केलं आहे. मात्र सायराला एका पेशंटच्या अंगावर आलेले फोड पाहून वेगळीच शंका य़ेते. ती खरं काय याचा शोध घेऊ लागते.

दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये झोपडपट्टय़ांमधील लोकांवर लशीची ट्रायल घेण्यास सुरुवात झाली होती. त्यांना पैशांचे अमिष दाखवून त्य़ांच्याकडून संमतीपत्रक घेऊन लस टोचली जात आहे. त्याच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मंगुला त्याच्याविषयी समजतं. तसंही त्याला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं आहे. त्यामुळे आपल्याला एका लशीच्या डोससाठी दहा हजार रुपये मिळणार असल्याचे कळताच त्याला अत्यानंद होतो. आणि तेथून पुन्हा एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात झालेली असते. वास्तविक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुकाराम नावाच्या एका व्यक्तीचा त्याच लशीमुळे मृत्यु झाल्याची बातमी डॉ.नाथ यांच्यापर्यत गेलेली असते. त्यानंतर आणखी आठ जणांना त्या लशीची जीवघेणी लक्षणं दिसून आली होती. आता ह्युमनचा प्रवास जीवघेणा झाला आहे.

Human Serise
Pushpaच्या 'उ अंतवा' गाण्यावर नवरा-नवरीचा जबरदस्त डान्स Viral!

वैदयकीय क्षेत्रातील भयानक विदारक वास्तव ह्युमनच्या निमित्तानं आपल्या समोर आलं आहे. विपुल शहा निर्मित या सीरिजचं दिग्दर्शन विपुल शहा आणि मोझेस सिंग यांनी केलं आहे. थरारक, वेगवान कथानक यामुळे प्रेक्षकांची पसंती या मालिकेला मिळाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील एका वेगळ्या विषयाला केलेला स्पर्श आणि त्याभोवती गुंफण्यात आलेली कथा यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या फायद्यासाठी वैदयकीय कंपन्या कोणत्या थराला जाऊ शकतात, त्यांच्यासाठी काय फायद्याचे आहे, यासोबतच ज्यांच्या माध्यमांतून हे सगळं केलं जातं त्या रुग्णालयांचे लागेबांधेही मालिकेतून आपल्यासमोर आले आहेत. दिग्दर्शकांन वेगळ्या विषयाची मांडणी करुन प्रेक्षकांना भविष्याच्या दृष्टीनं अधिक सजग केलं आहे.

* मालिकेचं नाव - ह्युमन

* दिग्दर्शक - विपुल शहा आणि मोझेस सिंग

* रेटिंग - *** स्टार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.