'मी पण हिंदू, तांडव पाहून अपमानित झाले नाही'

swara bhaskar tweet to support webseries
swara bhaskar tweet to support webseries
Updated on

मुंबई - तांडव मालिकेवरुन चाललेला वाद अजून पुरता मिटलेला नाही. या मालिकेच्या दिग्दर्शकानं माफी मागितल्यानंतरही भाजपच्या काही नेत्यांकडून ही मालिका बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तांडव चा विषय ट्रेडिंग होत आहे. सोशल मीडियावरुन नेटक-यांनी या मालिकेला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. दुसरीकडे अभिनेता सैफ अली खान याच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासगळ्या निमित्तानं अभिनेत्री स्वरा भास्करनं एक व्टिट केलं आहे. त्यात तिनं व्यक्त केलेल्या मतामुळे पुन्हा एका वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे.

स्वरा भास्कर ही सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. ती वेगवेगळ्या घडामोडीवर प्रतिक्रिया देण्यासाठी प्रसिध्द आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणा-यांची संख्याही मोठी आहे. तिनं आता तांडव मालिकेवरुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरुन ती वादात सापडण्याची शक्यता आहे. तांडव मालिकेविषयी सांगायचे झाल्यास या मालिकेत हिंदूच्या भावना दुखावणारा आशय सादर करण्यात आला आहे. त्यातून हिंदू देवदेवतांचा अपमान होत असल्याचे टीका करणा-यांचे म्हणणे आहे. त्यावरुन पोलिसांकडे तक्रार देण्यापर्यत हे प्रकरण पेटले आहे. विशेषत सोशल मीडियावरुन त्याची तीव्रता आणखी वाढली आहे.

 स्वरानं यासगळ्या परिस्थितीवर व्यक्त होताना असे म्हटले आहे की,   मी पण एक हिंदू आहे. आणि ज्यावेळी मी तांडव मालिका पाहिली तेव्हा मला कुठेही अपमानित झाल्यासारखे वाटले नाही. आता मला प्रश्न पडला आहे तांडववर बंदी कशासाठी घातली जात आहे?  यासाठी स्वरानं  #banTandavseries आणि #banTandavnow हे हॅश टॅग वापरले आहे. ज्यावेळी स्वरानं व्टिट प्रसिध्द केले तेव्हापासून तिला नेटक-यांनी ट्रोल केले जात आहे. तिच्यावर टीका होताना दिसत आहे. जेव्हा पासून तांडववर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली तशी त्या मालिकेच्या निर्मात्यांनी त्यात बदल करण्याचे मान्य केले आहे. दरवेळी हिंदू देवदेवतांचा अपमान का केला जातोय असा प्रश्न नेटक-यांनी मालिकेच्या निर्मात्यांना विचारला आहे. 

दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगणानंही तांडवच्या दिग्दर्शकांना धारेवर धरले होते. तुम्ही अल्लाहची टिंगल करण्याचे धाडस दाखवू शकता का, तेवढी हिंमत तुमच्यात आहे का असा सवाल तिनं तांडवचे दिग्दर्शकांना विचारला होता. दुसरीकडे स्वराच्या वेगळ्या भूमिकेमुळे त्या दोघींमध्येही वाद होण्याची नाकारता येणार नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.