अजय देवगण,सिद्धार्थ मल्होत्रा,रकुल प्रित सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'थँक गॉड' चित्रपट रिलिज पुर्वी वादात अडकला आहे. या चित्रपटातील चित्रगुप्त यांच्या प्रमुख भूमिकेमुळे हा वाद झाला आहे. लोकांनी त्यांच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा वाद कोर्टातही गेला आणि सर्वोच्च न्यायालयानं आता निर्मात्यांना दिलासा देत उच्च न्यायालयानं या चित्रपटावर तातडीनं निर्णय घेण्याच्या याचिकेवर सुनावणी केली आहे. कोर्टानं ती याचिका फेटाळून लावली आहे.
आता या चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, 'आमच्याकडून काही चूक झाली असेल तर ती सुधारण्याची आमची तयारी आहे. पण, 'थँक गॉड' चित्रपटात चित्रगुप्त सूटबूटमध्ये दिसण्यावर आक्षेप घेणाऱ्यांना मला एवढंच विचारायचं आहे की, 'ओ माय गॉड' चित्रपटात अक्षय कुमारने पॅन्ट-शर्ट घातला होता का?’ तेव्हा आपत्ती का नव्हती असा सवाल ते करत आहे.
चित्रपटात अजय देवगणने चित्रगुप्ताच्या भूमिकेसाठी घातलेल्या सूट बूटच्या विरोधात सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेण्ड बद्दल इंदर कुमार म्हणाले, ' चित्रगुप्त हे देवाच्या श्रेणीत येतात हे आम्हाला माहीत नव्हते. पण, आता कळते की आपल्या समाजातील एक वर्ग त्यांची पूजा करतो. आम्ही मानतो की आमच्याकडून काही चुका झाल्या असतील,जर तुम्ही त्या आमच्या निदर्शनास आणुन दिल्यात तर आम्ही त्यावर काम करु पण, माझा प्रश्न एकच आहे की, सोशल मीडिया युर्जसंचा असा वेगवेगळा दृष्टिकोन कसा असू शकतो? 'ओ माय गॉड' चित्रपटात जर अक्षय कुमारला पँट शर्टमध्ये श्रीकृष्णाच्या भूमिकेत लोकांनी स्वीकारले असेल तर माझ्या चित्रपटात अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेत सूट बूट घातलेला असताना एवढा वाद का?'.
'थँक गॉड' हा मानवी गरजा आणि त्यापूर्ण करण्यासाठी केलेल्या पाप-पुण्यांचा लेखाजोखा मांडणारा चित्रपट आहे. इंद्र कुमार यांनी चित्रपटाच्या कथेचे संपूर्ण श्रेय त्यांचे लेखक आकाश कौशिक आणि मधुर शर्मा यांना दिले. ते म्हणाले, 'आम्ही ही कहानी कोरोना लाटेच्या आधीच तयार केली होती, .मात्र सतत लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले. , देवाचे आभार मानतो की आम्ही हा चित्रपट यशस्वीपणे पुर्ण करु शकलो आणि आता तो प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.