IMAX 2023 Top Films: 'ओपेनहायमर'नं शाहरुखच्या 'जवान' अन् 'पठाण'ला टाकलं मागे! 'अ‍ॅनिमल' कितव्या स्थानावर?

प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलानचा ओपेनहायमर प्रदर्शित झाला आणि त्याचा जगभर डंका होता.
IMAX 2023 Oppenheimer Break Shah Rukh Pathaan Jawan
IMAX 2023 Oppenheimer Break Shah Rukh Pathaan Jawanesakal
Updated on

IMAX 2023 Oppenheimer Break Shah Rukh Pathaan : प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलानचा ओपेनहायमर प्रदर्शित झाला आणि त्याचा जगभर डंका होता. त्या चित्रपटाची जोरदार चर्चाही झाली. समीक्षक, अभ्यासक आणि चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही झाल्याचे दिसून आले. या सगळ्यात आता आयमॅक्स २०२३ सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी समोर आली आहे.

ओपेनहायमला जगभरातील अनेक देशांमध्ये महत्वाचे स्थान मिळताना दिसत आहे. त्यामुळेच की काय इतक्या दिवसांनंतरही त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. या तुलनेत बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या जवान आणि पठाणलाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. यातच साऊथच्या संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल चित्रपटाचेही नाव घ्यावे लागेल.

सध्या ८१ व्या गोल्डन ग्लोब पुरस्काराची चर्चा आहे. त्यात ओपेनहायमरनं त्याच्या नावावर कित्येक पुरस्कार केले आहेत. सोशल मीडियावर ओपेनहायमरच्या नावाची चर्चा आहे. नेटकऱ्यांकडून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत. अशातच आयमॅक्सच्या त्या यादीत ओपेनहायमरनं पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यानं पठाण आणि जवानला मागे टाकलं आहे.

आयएमएएक्सच्या त्या यादीनुसार, भारतातील टॉप १० सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेतील चित्रपटांमध्ये देखील ओपेनहायमर हा चित्रपट आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानंतर शाहरुखच्या पठाण आणि जवानचा क्रमांक आहे. आयएमएएक्सच्या थिएटरमधून ६.१३५ मिलियन युएसडी अंदाजे ५०.८४ कोटींची कमाई झाली आहे. त्यात एकट्या ओपेनहायमरचा वाटा हा २५ ते ३० टक्के एवढा आहे.

आयएमएएक्सच्या त्या यादीत दुसऱ्या स्थानावर अवतार दे वे ऑफ वॉटर आहे. हा चित्रपट भारतात १६ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. तो ही लोकप्रिय झाला होता. २०२३ मध्ये देखील त्यानं चांगली कमाई केली होती. शाहरुखचा जवान हा सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. भारतातून सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून त्याची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. जवान हा तिसऱ्या स्थानावर असून त्यानं आयएमएएक्समधून १३.८० कोटींची कमाई केली आहे.

किंग खानचा पठाण हा आयएमएएक्सच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्यानंतर मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन पाचव्या स्थानावर आहे. या चित्रपटानंतर रणबीरचा अॅनिमल हा चित्रपट आहे. त्यानं आयएमएएक्सच्या आकडेवारीनुसार त्यांच्या थिएटरमधून १ मिलियन युएसडी एवढी कमाई केली आहे. या खालोखाल हॉलीवूडच्या गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी व्हॉल्युम, स्पायडर मॅन, एंट मॅन एंड द वास्प- क्वांटूमेनिया आणि फास्ट एक्स यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.