Sonu Sood: माणुसकीला काळीमा..!बीडमध्ये सोनू सुदच्या नावाखाली मदतीचे पैसे हडपले

बीडच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
sonu sood, sonu sood news, beed, beed news, sonu sood movies
sonu sood, sonu sood news, beed, beed news, sonu sood moviesSAKAL
Updated on

Sonu Sood News: बीडमध्ये अभिनेता सोनू सुदच्या नावाखाली 69 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक घटना समोर आलीय. घटना अशी घडली आहे कि.. तलावात बुडून एकाच कुटुंबातील 3 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यामुळे या कुटुंबाला अनेकांनी आर्थिक मदत केली. नंतर सोनू सूदच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून सायबर भामट्यांनी याच मदतीच्या पैशांवर डल्ला मारला आहे.

एनी डेस्क अॅप डाऊनलोड करायला लावून सर्व ओटीपी घेत 69 हजार 566 रुपये ऑनलाइन लुटल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी बीडच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

(In Beed, charity money was stolen by use false name of bollywood actor Sonu Sood)

हेही वाचा: शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

बीडच्या केज तालुक्यातील पैठण येथे 21 मार्च रोजी जयराम हरिभाऊ चौधरी यांच्या मुलासह दोन पुतण्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

चौधरी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी नातेवाईक, मित्र परिवारांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांना आर्थिक मदत केली. पण याच पैशांवर सायबर भामट्यांचा डोळा होता.

30 मार्चला जयराम यांना सोनू सूद फाउंडेशन कार्यालयातून बोलत असल्याचा एक कॉल आला. "तुम्हाला 3 लाख रुपयांची मदत करायची असून मी विचारलेली माहिती सांगा.." असं सांगत भामट्यांनी त्यांना बोलण्यात भुलवले.

त्यांना मोबाइलमध्ये एनी डेस्क अँप डाऊनलोड करायला लावून पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड, बैंक पासबुक अशा गोष्टींची या भामट्यांनी माहिती घेतली.

sonu sood, sonu sood news, beed, beed news, sonu sood movies
Ajay Devgan Birthday: पद्मश्री अजय देवगणचं खरं नाव माहितीये का? ऐकून चकितच व्हाल
sonu sood, sonu sood news, beed, beed news, sonu sood movies
Prajakta Mali: मनसेच्या नवीन गाण्यावर बिनधास्त थिरकली प्राजक्ता.. व्हिडिओ तुफान व्हायरल

नंतर वेगवेगळे ओटीपी घेऊन त्यांच्या खात्यातून 10 हजार, 9 हजार 999, 18 हजार 321, 18 हजार 297, 5 हजार, 4 हजार 800 आणि 3 हजार 49 असे जवळपास 69 हजार 566 रुपये ऑनलाइन काढून घेतले.

खात्यातून पैसे गेल्याचं लक्षात आल्याचे समजताच चौधरी यांनी परत त्याच क्रमांकावर कॉल केला. परंतु तो नंबर बंद होता. त्यावरुन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चौधरी यांच्या लक्षात आले.

पुढे त्यांनी युसूफवडगाव आणि नंतर सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. दरम्यान याप्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस या भामट्याचा शोध घेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()