IND vs AUS 2023 Viral Post : भारतीय खेळाडुंना ट्रोल करणाऱ्यांना अभिनेता जितेंद्र जोशीनं फटकारलं! 'आपल्याच खेळाडूंबाबत आपण...'

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन संघानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पराभव केल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे.
IND vs AUS 2023 Final Jitendra Joshi Insta Post
IND vs AUS 2023 Final Jitendra Joshi Insta Post esakal
Updated on

IND vs AUS 2023 Final Jitendra Joshi Insta Post : भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन संघानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पराभव केल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे.त्यात नेटकऱ्यांनी टीम इंडियाला ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. अशावेळी मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशी टीम इंडियाच्या बाजूनं ठामपणे आपली बाजू मांडली आहे.

इंस्टावर जितेंद्र जोशीच्या त्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो की, मला माहिती आहे की, टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी लगेचच टीम इंडियाच्या खेळाडूंना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आणि हा सगळा प्रकार अत्यंत घृणास्पद म्हणावा लागेल. प्रत्येक खेळाडुला ट्रोल करणे आणि दोष देण्याचा प्रकार आता सुरु झाला आहे. या सगळ्यात आपण आपल्या खेळाडुंप्रती दोन शब्द चांगले बोलू शकत नाही, त्यांचे कौतुक करु शकत नाही.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

जो संघ एवढ्या मेहनतीनं फायनलपर्यत आला त्या खेळांडुप्रती आपण काय विचार करतो हे जास्त महत्वाचे आहे. मला माझ्या टीमचा अभिमान आहे. त्यांनी एकही सामना न गमावता फायनलपर्यतचा आपला प्रवास सुरुच ठेवला. तुम्ही आम्हाला एक स्वप्नही दाखवलं. आपण एकत्रितपणे खेळ करत प्रेक्षकांना जिंकून घेतले हा आनंदही मोठा आहे.

शेवटी हा एक खेळ आहे. त्यात एकजण जिंकणार आणि एकजण हारणार. आजचा दिवस आपला नव्हता. पण टीम इंडियानं चांगला खेळ केला. या क्षणी मला वाईट वाटते आहे. आपण आणखी चांगली कामगिरी करु शकलो असतो. पण आपल्यापेक्षा ऑस्ट्रेलियानं चांगला खेळ केला आणि ते यशस्वी झाले,. त्यामुळे त्यांचे कौतुक आणि अभिनंदन. अशा शब्दांत जितेंद्रनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.