प्रत्येकवेळी डोळ्यात पाणी आणणारं 'ये मेरे वतन के लोगो' हे गाणं कसं घडलं माहितीय?

Independence day 2022 : 'ये मेरे वतन के लोगो' या गाण्याला लता दीदींनी दिला होता नकार,पण ऐनवेळी असं काही झालं की लता दीदींचा आवाज ऐकून जवाहरलाल नेहरूंना अश्रु अनावर झाले.
Independence day 2022 : journey of ye mere watan ke logo song lata mangeshkar
Independence day 2022 : journey of ye mere watan ke logo song lata mangeshkar sakal
Updated on

independence day 2022 : आज भारत आपल्याला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करत आहे. लाखों वीरांच्या बलिदानाने प्राप्त झालेल्या या स्वातंत्र्याला आज 75 वर्षे झाली. त्या निमित्ताने देशभरात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' म्हणजेच 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. भारत देशात एक असं गाणं घडलं जे आजही कोणत्याही राष्ट्रीय कार्यात, स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ता दिनी आवर्जून ऐकले जाते, ते गाणे म्हणजे 'ये मेरे वतन के लोगो'.. ही गाणं ऐकून आजही सहज डोळे पाणवतात. अहो आपलेच काय चक्क त्यावेळचे देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूही हे गाणे ऐकून रडले होते. पण हे गाणे कसे घडले माहितीय? त्यामागेही एक ऐतिहासिक आणि रंजक पार्श्वभूमी आहे. या अमृत महोत्सवा निमित्त जाणून घेऊन या अजरामर गीताचा प्रवास..

(Independence day 2022 : journey of ye mere watan ke logo song sung by lata mangeshkar)

1962 च्या चीनसोबतच्या युद्धात भारताचा पराभव झाला. त्यामुळे भारतात मोठी उलथापालथ झाली. संपूर्ण समाजाचे मनोधैर्य खचले, राजकीय नेते हताश झाले. देशापुढे आलेले हे भयाण संकट कसे पेलायचे हाच मोठा प्रश्न होता. त्यावेळी देशाला प्रोत्साहन देण्यासाठी कलाविश्वाने पुढे यावे अशी मागणी सर्वस्तरातून झाली. तत्कालीन सरकारने देशाला नवसंजीवनी देता येईल असे काही करावे अशा सूचना मनोरंजन विश्वाला देण्यात आल्या. त्यावेळी देशभक्तीपर गीते लिहिणाऱ्या कवी प्रदीप यांनी पुढाकार घ्यावा असे त्यांना सांगण्यात आले आणि त्यातूनच 'ए मेरे वतन के लोगो' या गाण्याचा जन्म झाला.

सुरवातीला लता मंगेशकर यांनी या गाण्याला नकार दिला होता.1963 मध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी हे गाणं दिल्ली येथे गाण्याची ही ऑफर होती. परंतु त्यावेळी लतादिदी खूपच व्यस्त असल्याने त्यांनी या गाण्याला नकार दिला. या गाण्यावर सराव करणे हे दिदींना वेळेअभावी शक्य नव्हते. परंतु कवि प्रदीप यांनी खूपच विनंती केल्यानंतर लताबाई तयार झाल्या पण त्यांनी आशा भोसले यांच्यासोबत हे गाणं गायीन असे सांगितले.परंतु कार्यक्रमाला काही दिवस बाकी असतानाच आशा भोसले यांनीही गाण्याला नकार दिला. पुढे 'ऐ मेरे वतन के लोगों' या प्रकल्पाचे सूत्रसंचालन करणारे संगीतकार हेमंत कुमार यांनीही आशा भोसले यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्या मान्य झाल्या नाहीत. अशा स्थितीत लता मंगेशकर यांना एकट्याने गाण्याची तयारी करावी लागली.

'ए मेरे वतन के लोगों' या गाण्याला चाल देणारे सी. रामचंद्र हे चार-पाच दिवसांपूर्वी दिल्लीला रवाना झाले होते. अशा स्थितीत लता मंगेशकर यांना रियाझची साथ मिळू शकली नाही. रामचंद्र यांनी त्यांना गाण्याची टेप दिली होती, ती ऐकूनच लतादीदींना गाण्याचा रियाज केला. कार्यक्रमासाठी विमानाने दिल्लीला जाताना लताजी रामचंद्रांनी दिलेल्या टेप्स ऐकत राहिल्या आणि 27 जानेवारी 1963 रोजी नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियवर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत त्यांनी हे गाणे गायले.

लता मंगेशकर एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, 'गाणे संपवून जेव्हा मी स्टेजवरून निघाले तेव्हा मेहबूब खान आले आणि हात धरून म्हणाले, 'चलो नेहरू जी ने बुलाया है'. पंडितजींना त्यांना का भेटायचे आहे, असा प्रश्न मला पडला. मी स्टेजवर जाताच पंडितजींसह सर्वांनी उभे राहून माझे स्वागत केले. पंडितजींनी गाण्याची स्तुती केली, त्यावेळी जवाहलाल नेहरू यांचे डोळे पाणावले होते.' पुढे हे गाणे देशभरात ऐकले गेले आणि खूपच लोकप्रिय झाले. आज हेच गीत एक आजारामर गीत म्हणून ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.