India Marvels and Mysteries News: हिस्ट्री टीव्ही 18 च्या ‘इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ या पुरस्कार विजेत्या डॉक्युसिरीजचा पुढचा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. जगप्रसिद्ध लेखक विल्सम डॅलरिंपल हे या डॉक्युसिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली तथ्ये, रहस्ये, कहाण्या पुन्हा उजेडात आणण्याचा आणि मानवी मनाला पडलेल्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा या डॉक्युसिरीजद्वारे प्रयत्न करण्यात आला आहे.
ही उत्तरे शोधण्यासाठी भारतातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जागा, पुरातन वास्तू यांना भेटी देण्यात आल्या असून काळाच्या उदरात गाडली गेलेली उत्तरे शोधून बाहेर काढली जाणार आहेत. या प्रयत्नातून अनेक धक्कादायक बाबी उजेडात येणार आहेत.
हजारो लाखों वर्षांपूर्वीची मानवी संस्कृती, भारतातील साम्राज्ये, त्याकाळी आपल्या पूर्वजांनी कोणतीही प्रगत साधने नसतानाही निर्माण केलेल्या वास्तू हे सगळं या डॉक्युसिरीजमधून आपल्याला पाहाता येईल.
डॉक्युसिरीजचा प्रत्येक भाग हा अर्धा तासांचा असून यामध्ये भारताच्या विविध भागांचा इतिहास त्याच्याशी निगडीत रहस्ये, गूढ, अगम्य बाबी अशा असंख्य गोष्टींचा उलगडा करून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ विथ विल्यम डॅलरिंपलची सुरुवात 4 जानेवारी 2024 पासून होणार आहे. ही डॉक्युसिरीज एक्स्लुझिव्हली हिस्ट्री टीव्ही 18 वर पाहता येणार आहे.
देशभरात प्रवास करून तयार करण्यात आलेल्या या मालिकेमध्ये, भारतातील प्रसिद्ध आणि भव्य वास्तुशिल्पांची, ऐतिहासिक ठिकाणांची स्थानांची नव्याने ओळख होते. ही ठिकाणे किंवा वास्तू अशा आहेत ज्यांच्याभोवतीचे गूढ उलगडण्याचा या मालिकेतून प्रयत्न करण्यात आला आहे.
ऐतिहासिक घटना त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती यांचे आजच्या आधुनिक युगातील महत्त्व. वास्तू, जागा यांचे गूढ उलगडून सांगताना तज्ज्ञांनी त्यावर टाकलेला प्रकाश आणि घटना कशा घडल्या असतील याचा अंदाज येण्यासाठी करण्यात आलेले नाट्यरुपांतर यामुळे दर्शकांना ही डॉक्युसिरीज खिळवून ठेवेल.
या मालिकेचा उद्देश हा भारताच्या संपन्न आणि वैभवशाली इतिहासाचा मागोवा घेणे हा आहे. ही मालिका सात भागांची असून ही मालिका दर्शकांसाठी अविस्मरणीय अनुभव देणारी ठरणारी आहे.
पाहा ‘इंडिया: मार्व्हल्स अँड मिस्ट्रीज’ विथ विल्यम डॅलरिंपल’ 4 जानेवारी 2024 पासून दर गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त हिस्ट्री टीव्ही18 वर. दर गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9 वाजता या मालिकेतील नवा भाग आपल्याला पाहायला मिळेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.