वंदे मातरम् म्हणत India Vs Bharat वादात अभिनेते मनोज जोशींची उडी, विशेष गाणं गाऊन जाहीर केलं मत

हिंदी तसेच मराठी मनोरंजन विश्वात काम करणारे अभिनेते मनोज जोशींनी India Vs Bharat स्वतःचं मत जाहीर केलंय
india vs bharat manoj joshi comment on controversy while singing song Bharat Humko Jaan Se Pyara Hai
india vs bharat manoj joshi comment on controversy while singing song Bharat Humko Jaan Se Pyara Hai SAKAL
Updated on

सध्या संपूर्ण भारतात India Vs Bharat वाद चांगलाच पेटलाय. भारताचं India नाव बदलून भारत करण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार आहे.

देशभरात हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अशातच मनोरंजन विश्वातुन अनेक कलाकार या मुद्द्यावर त्यांचं मत मांडत आहेत. अशातच हिंदी तसेच मराठी मनोरंजन विश्वात सक्रीय असलेले अभिनेते मनोज जोशी यांनी या वादात एक गाणं गाऊन प्रतिक्रिया दिलीय.

(india vs bharat manoj joshi comment on controversy)

india vs bharat manoj joshi comment on controversy while singing song Bharat Humko Jaan Se Pyara Hai
India VS Bharat 'भारत माता की जय' इंडीया नाव बदलण्याच्या वादात बिग बींची उडी

भारताच्या नाव बदलणाच्या वादात बॉलीवूड अभिनेता मनोज जोशी यांनी ट्विटरवर भारत हमको जान से प्यारा है हे गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सदियों से भारत भूमि दुनिया की शान है, भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है, भारत हमको जान से प्यारा है सबसे न्यारा गुलिस्ताँ हमारा है असे या गाण्याचे बोल आहेत.

व्हिडीओच्या अखेरीस मनोज जोशींनी भारत माता की जय, वंदे मातरम् चा नारा दिला. याशिवाय व्हिडीओ शेअर करताना “भारत माता की जय.” असं त्यांनी लिहीलं आहे. मनोज जोशी यांनी अलीकडेच ड्रीम गर्ल 2 सिनेमात अभिनय केला.

केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात इंडिया नाव बदलून केवळ भारत करण्याचा सरकारचा इरादा असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यासंदर्भात संसदेमध्ये विधेयक आणले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या नाव बदलावर टीका केली असली, तरी सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

india vs bharat manoj joshi comment on controversy while singing song Bharat Humko Jaan Se Pyara Hai
OMG 2 नंतर अक्षय कुमारच्या या गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल येणार? अनुपम खेरने केला इशारा

केंद्र सरकारने G-20 परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रावर 'इंडिया' ऐवजी 'भारत' असा उल्लेख केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बदलाचे स्वागत केले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात 'भारतमाता की जय' हीच घोषणा प्रत्येक देशवासियांच्या मुखातून ऐकू येत होती, असं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.