India Vs Bharat: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून ते सर्व सामान्य माणसापर्यंत एकाच विषयची चर्चा होतांना दिसत आहे. ती म्हणजे देशाचे नाव बदलण्यात येणार असे. देशाचे नाव इंडिया बदलून भारत करण्यात येणार अशा चर्चा जोरात सुरु आहे.
इतकच नाही तर नरेंद्र मोदी सरकार संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात इंडिया नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव आणू शकते. यावरुनच सध्या दोन वेगवेगळ्या टोकाचं राजकारण सुरु झालं आहे. त्यातच विरोधकांनी देखील यावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे परिणामी देशात इंडिया विरुद्ध भारत अशी चर्चा सुरू झाली आहे.
तर यावर सर्व सामान्य लोकांपासून मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर 'भारत माता की जय'चा नारा देत याला पाठिंबा दिली होती तर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही कुठे मागे राहणार. तिने देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे. खर तर कंगनाने यावर बोलतांना तिची एक जुनी पोस्ट पुन्हा शेयर केली आहे. ज्यात तिने आधीच इंडियाचं नाव बदलण्यात यावं याबद्दल लिहिलं होतं.
कंगनाने तिच्या ट्विटर खात्यावर एक जुनी पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. ज्यात तिने म्हटलं होतं की 2021 मध्ये 'गुलाम नाम' इंडियाला रद्द करायला हवं. त्याऐवजी देशाला 'भारत' म्हणायला हवं. कंगनानं आता ही पोस्ट रिशेअर करत लिहिले, "आणि काही लोक याला काळी जादू म्हणताय... ही फक्त धूसर बाब आहे प्रिये... सर्वांचे अभिनंदन!! एक गुलाम नावापासून मुक्त झालो आहोत... जय भारत.
यापुर्वी अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट शेयर करत लिहिले होते की 'भारत माता की जय नारा'. या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी अमिताभ यांच्या ट्विटला देशाच्या नामांतराच्या प्रकरणाशी जोडले आणि अनेक प्रतिक्रिया समोर आल्यात. मात्र या निर्णयाला काही कलाकार विरोधही करतांना दिसत आहे.
कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ती लवकरच दिग्दर्शक सर्वेश मेवाडा यांच्या तेजस या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिड्डा'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'इमर्जन्सी' मध्ये दिसणार आहे. त्यातबरोबर ती साउथच्या 'चंद्रमुखी 2'मध्ये दिसणार आहे. ज्याचा ट्रेलर काही दिवसांपुर्वीच रिलिज झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.