Viral Mims: पराभव पाकिस्तानचा पण, मीमर्सला आठवल्या निर्मला सीतारमण

भारतीय क्रिकेट संघावर कौतूकाचा पाऊस पडतोय. त्याचे कारण म्हणजे काल पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा मेलबर्नमध्ये केलेला पराभव.
Viral Mims
Viral Mimsesakal
Updated on

Viral Mims: भारतीय क्रिकेट संघावर कौतूकाचा पाऊस पडतोय. त्याचे कारण म्हणजे काल पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा मेलबर्नमध्ये केलेला पराभव. यासगळ्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे चाहत्यांनी वारेमाप कौतूक केले आहे. त्यानं केलेल्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारतीय संघाला विजयाला गवसणी घालता आली. यासगळ्यात सोशल मीडियावर वेगवेगळ्या मीम्सला सुरुवात झाली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर देखील भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वी सीतारामन यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये रुपया घसरला नसून अमेरिकन डॉलरचा दर वाढला आहे. असे अजब वक्तव्य केले होते. त्यावरुन त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आले होते. त्यांच्या वक्तव्यातील विरोधाभास हा नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास कारणीभूत होता.

काल झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव करत चाहत्यांना दिवाळीचं अनोख गिफ्ट दिलं. यासगळ्या व्हायरल झालेल्या मीम्समध्ये सीतारामन यांच्या त्या वक्तव्याची पुन्हा एकदा आठवण करुन देण्यात आली आहे. त्या मीम्समध्ये त्यांना एक जण सांगतो की, पाकिस्तान मॅच हरला. त्यावर नेटकऱ्यांनी सीतारामन यांचा फोटो पोस्ट करुन त्यापुढे लिहिले आहे की, ते मॅच हरले नाहीत तर आपण मॅच जिंकलो आहोत. त्या मीम्सला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

Viral Mims
Malaika Arora: किती कोटींची मालकीण आहे मलायका?

अनेकांनी व्हायरल झालेल्या त्या मीम्सवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कालच्या सामन्यात विराटनं केलेल्या कामगिरीनं सोशल मीडियावर मीम्स, वेगवेगळे फोटो आणि व्हि़डिओ यांना उधाण आले आहे. कोहलीच्या खेळीचे कौतूक होताना दिसत आहे.

Viral Mims
Mallika Sherawat: 'मलमली तारुण्य माझे'!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.