इतरांच्या जोड्या जुळवणाऱ्या Karan Johar च्या घरातच भारतातला पहिला घटस्फोट झालेला

देशात घटस्फोटाच्या पद्धतीला करण जोहरच्या घरापासून सुरुवात झाली
karan johar. karan johar family, I.S.Johar
karan johar. karan johar family, I.S.JoharSAKAL
Updated on

Karan Johar News: करण जोहर हा बॉलिवूडमध्ये इतरांच्या जोड्या जुळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. रणबीर कपूर पासून ते नुकत्याच लग्न झालेल्या सिद्धार्थ - कियारा अडवाणी पर्यंत सगळ्यांच्या जोड्या जुळवण्यात करण जोहरचा मोठा वाटा आहे.

इतरांच्या जोड्या जुळवण्यात यशस्वी असलेला करण जोहरच्या घरात मात्र देशातील पहिल्या घटस्फोटीत व्यक्तीचं कनेक्शन आहे.

(India's First Divorcee Connects in Matchmaker Karan Johar's Home)

karan johar. karan johar family, I.S.Johar
Namrata Pradhan: गालावर खळी डोळ्यात धुंदी.. क्षणोक्षणी चाहते तुझ्याच प्रेमात नम्रता

भारतात घटस्फोटाची सुरुवात झालेली करण जोहरच्या घरापासून. देशात घटस्फोटाच्या पद्धतीला करण जोहरच्या घरापासून सुरुवात झाली. त्यांचं नाव आयएस जोहर.

आय.एस.जोहर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसिद्ध विनोदी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते होते. जोहर यांनी १९४३ साली लाहोरमध्ये रम्मा बेन्सशी लग्न केले. या दोघांना अनिल आणि अंबिका हि दोन मुलं आहेत.

जोहर आणि रम्मा यांचा घटस्फोट झाला होता. या दोघांचा घटस्फोट भारतातील पहिला कायदेशीर घटस्फोट होता. या घटस्फोटानंतर, जोहर यांनी पुढेही लग्न केले, पण त्यांची ती लग्नही टिकली नाहीत.

जोहर यांचा तब्बल ४ वेळा घटस्फोट झाला. आयएस जोहर यांचं करण जोहर सोबत कनेक्शन कसं? तर आयएस जोहर हे करण जोहरचे काका आहेत. करण जोहरचे बाबा हिरु यांचे आयएस जोहर हे भाऊ आहेत.

karan johar. karan johar family, I.S.Johar
Prasad Oak Birthday: लग्नाआधीच झालेले एकमेकांचे नवरा - बायको..! अशी आहे प्रसाद - मंजिरीची प्रेमकहाणी

इंद्रजीत सिंग जोहर यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1920 रोजी झाला. अभिनेता होण्याआधी त्यांनी उच्चशिक्षण घेतलं. त्यांनी एलएलबी, अर्थशास्त्त आणि राजकारण विषयात पदवी घेतली.

ऑगस्ट 1947 मध्ये, भारताच्या फाळणीच्या वेळी, जोहर आपल्या कुटुंबासह पटियाला येथे लग्नासाठी जात असताना लाहोरमध्ये गंभीर दंगल उसळली, परिणामी शाह आलमी बाजार, जो एकेकाळी मोठा हिंदू भाग होता, पूर्णपणे जळून खाक झाला.

karan johar. karan johar family, I.S.Johar
Prasad Oak: 'धर्मवीर' नंतर आता प्रसाद ओक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत? विजू मानेंची घोषणा

जोहर लाहोरला परतले नाही. काही काळासाठी त्यांनी जालंधरमध्ये काम केले त्यांचे कुटुंब दिल्लीतच होते. पुढे ते मुंबईला गेले, जिथे त्यांनी १९४९ च्या हिंदी कॉमेडी अॅक्शन चित्रपट 'एक थी लडकी'मधून अभिनयात पदार्पण केले.

जोहर वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात तितकेसे यशस्वी झाले नाहीत. पुढे त्यांचा पुतण्या करण जोहरने हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःचं नाव कमावलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()