2018 in Oscar: भारताची ऑस्करची आशा संपुष्टात! निवडीत अपयशी ठरल्याने दिग्दर्शक भावूक, म्हणाले...

भारतातर्फे यंदा 2018 हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत होता
 India's Oscar hopes end! The director of 2018 movie was emotional after failing in the selection
India's Oscar hopes end! The director of 2018 movie was emotional after failing in the selection SAKAL
Updated on

2018 in Oscar: ऑस्कर 2024 पुरस्कारांसाठी काही दिवसांपुर्वी नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. आणि मल्याळम चित्रपट 2018, जो ऑस्करसाठी भारताचा अधिकृत प्रवेश होता. 2018 सिनेमाला ऑस्करच्या फायनल 15 चित्रपटांच्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवू शकले नाही.

2018 चे दिग्दर्शक ज्यूड अँथनी जोसेफ यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. चित्रपटाला प्रोत्साहन देण्यासाठी ज्यांनी सपोर्ट केला त्यांची त्यांनी माफी मागितली. काय म्हणाले दिग्दर्शक बघा.

 India's Oscar hopes end! The director of 2018 movie was emotional after failing in the selection
Gautami Deshpande: गौतमी देशपांडे करणार लग्न! मेहंदीचे फोटो व्हायरल, कोण आहे होणारा नवरा?

ज्यूड लिहीतात, “सर्वांना शुभेच्छा. ऑस्करच्या शॉर्टलिस्टचे अनावरण करण्यात आले आहे आणि खेदाची गोष्ट म्हणजे आमचा चित्रपट “2018- एव्हरीवन इज अ हिरो” ने जगभरातील 88 आंतरराष्ट्रीय भाषेतील अंतिम 15 चित्रपटांमध्ये स्थान मिळवले नाही. तुम्हा सर्वांना निराश केल्याबद्दल मी माझ्या सर्व हितचिंतकांची आणि समर्थकांची मनापासून माफी मागतो.”

कृतज्ञता व्यक्त करताना दिग्दर्शक पुढे लिहितात, “तरीही, या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी हा एक स्वप्नासारखा प्रवास आहे जो मी आयुष्यभर जपत राहीन. सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आणि ऑस्करसाठी अधिकृत भारतीय प्रवेश ही कोणत्याही चित्रपट निर्मात्याच्या कारकिर्दीतील दुर्मिळ कामगिरी आहे. या विलक्षण प्रवासासाठी माझी निवड केल्याबद्दल मी देवाचा ऋणी आहे. निर्माते, तंत्रज्ञ, कलाकार आणि प्रेक्षकांनी आमच्या चित्रपटाला दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

 India's Oscar hopes end! The director of 2018 movie was emotional after failing in the selection
गौतमी देशपांडेंचे मेहंदीचे फोटो व्हायरल! लवकरच करणार लग्न

दिग्दर्शक ज्यूड पुढे लिहीतात, "भारतीय फिल्म फेडरेशन, विशेषत: सर रवी कोट्टारकारा, यांच्या अमर्याद पाठिंब्याबद्दल, प्रेमाबद्दल आणि आमच्या चित्रपटाची भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवड केल्याबद्दल कृतज्ञता. पन नलिन, सिद्धार्थ रॉय कपूर, गुनीत मोंगा, रिंटू थॉमस, आशुतोष गोवारीकर सर, रेसुल पुक्कुट्टी सर, अनुराग कश्यप, राजामौली सर, सेंथी सर आणि मला या प्रवासात पाठिंबा देणाऱ्या सर्व भारतीय चित्रपट निर्मात्यांचे मी आभार मानतो."

शेवटी दिग्दर्शकांनी ऑस्करसाठी ज्या सिनेमांची निवड झाली त्यांना शुभेच्छा दिल्या असून ऑस्करमध्ये पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी आशा बाळगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.