Ankita Walawalkar: कोकण हार्टेड गर्ल सोबत मुंबईतील KEM हॉस्पिटलमध्ये घडला धक्कादायक प्रकार, जाणून घ्या

अंकिताने तिला आलेल्या KEM हॉस्पिटलचा धक्कादायक अनुभव उघडकीस केलाय.
INFLUENCER Ankita Walawalkar shared bad experience in bmc kem hospital mumbai
INFLUENCER Ankita Walawalkar shared bad experience in bmc kem hospital mumbai SAKAL
Updated on

Ankita Walawalkar News KEM Hospital Mumbai News: अंकिता वालावलकर ही कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. अंकिताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. अंकिता यु ट्यूबवर सुद्धा सक्रिय असते.

अंकिताने नुकतंच तिच्या यु ट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत अंकिताने तिला आलेल्या KEM हॉस्पिटलचा धक्कादायक अनुभव उघडकीस केलाय. त्यामुळे सध्या या व्हिडिओची सगळीकडे चर्चा आहे.

(INFLUENCER Ankita Walawalkar shared bad experience in bmc kem hospital mumbai )

INFLUENCER Ankita Walawalkar shared bad experience in bmc kem hospital mumbai
Asit Modi FIR: सर्वांसमोर माझी माफी मागा नाहीतर... जेनिफर आणि असित मोदींमधला वाद टोकाला

अंकिताचा मित्र असलेला किरण चव्हाण याच्या मेंदूला दुखापत झाल्याने त्याला सिंधुदुर्ग येथून थेट केइएम रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्याला १४ जून रोजी इस्पितळात दाखल करण्यात आलं.

मात्र संपूर्ण दिवसभर त्याच्याकडे कोणताही डॉक्टर फिरकला नाही. त्याच्यावर कोणतेही उपचार झाले नाहीत. ही गोष्ट समजताच अंकिताही इस्पितळात पोहोचली आणि तिने याबद्दल विचारपूस केली.

शेवटी तिने मदत मिळवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट प्रमुख अमेय खोपकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खोपकरांनी सूत्र हलवली आणि किरणवर उपचार सुरू झाले. या सगळ्या प्रकारात इस्पितळाची सिटीस्कॅनची मशीन बंद होती.

कोमामधे असलेल्या रुग्णाला तुम्हीच बाहेर घेउन जा आणि रिपोर्ट घेऊन या असं सांगण्यात आलं त्यामुळे अंकिताच्या मित्राचं बाहेरून सिटीस्कॅन करावं लागलं.

INFLUENCER Ankita Walawalkar shared bad experience in bmc kem hospital mumbai
Adipurush 6th day box office: कमाईची गाडी घसरली.. आदिपुरुषची सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमार कामगिरी

यावर बोलताना अंकिता म्हणते, 'हा प्रश्न फक्त माझ्या एकटीच्या रुग्णाचा नाहीये. इथे कित्येक रुग्ण आहेत आणि डॉक्टर खूप कमी आहेत. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

नर्सेसची सुद्धा हीच परिस्थिती आहे. मी इतर रुग्णांना विचारल्यावर त्यांनाही चांगली वागणूक मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. यावरून हॉस्पीटलची परिस्थिती किती वाईट आहे असं दिसतंय.' असं असेल तर हॉस्पीटल डॉक्टरांच्या रिकाम्या जागा का भरत नाही असा प्रश्न अंकिताने विचारला आहे.

त्यावर रुग्णालयातील प्रभारी अधिष्ठाता यांनी अंकिताला बाहेरून सिटीस्कॅन करावा लागला म्हणून ती त्याचा राग काढत आहे आणि असे व्हिडिओ प्रसिद्ध करत आहेत असं म्हटलं आहे.

एकूणच या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाची चूक उघडकीस आलीय. पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.