Gautami Patil: गौतमीची लावणी, झेडपीची शाळा हलली!

गौतमी पाटीलच्या लावणीत प्रेक्षक आउट ऑफ कंन्ट्रोल...
Gautami Patil
Gautami Patilesakal
Updated on

महाराष्ट्रात लावणी ही नृत्यकला फारच लोकप्रिय आहे. अशाच लावणीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी तुफान राडा केला.  कोल्हापुरची लावणी क्वीन आणि इस्टांस्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात हा प्रकार घडला. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग इथं गौतमीच्या लावणीचा कार्यक्रम होता. तिची लावणी पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी झाली. त्यातच काही प्रेक्षक जिल्हा परिषद शाळेच्या कौलारु छतावर जाऊन बसलेच नाही तर तिथे नाचूही लागले यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या छताचा पार चुराडा झाला इतकचं नव्हे तर जागा नसल्याने झाडावर प्रेक्षक बसल्याने अनेक झाडेही कोसळली.

बेडग इथल्या एका मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आणि बेडग गावाचं नाव देशात गाजवणार्‍या मानकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होतं. यातच सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नृत्याचा कार्यक्रम सुरु झाला. तिचं नृत्य पाहण्यासाठी जिल्ह्यातुनच नाही तर बाहेरुन तिचे चाहते आले होते. या लावणी कार्यक्रमात इतकी तुफान गर्दी जमली की मैदान कमी पडले. मग काही प्रेक्षकांनी जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र यात जिल्हा परिषद शाळेच्या कौलारु छताचा चुराडा झाला. तार जाळीच्या कम्पाऊंडचेही मोठं नुकसान झालं. त्याचबरोबर ज्या झाडावर प्रेक्षक बसले होते तेही झाड मुळासह पडले.

Gautami Patil
Gautami Patil: कोल्हापूरकरांच्या हृदयातली लावणी क्वीन गौतमी पाटील आहे तरी कोण...
Gautami Patil
कोल्हापूरकरांच्या हृदयातली लावणी क्वीन गौतमी पाटील आहे तरी कोण...

प्रेक्षक तिची लावणी पाहण्यासाठी काहीही करण्यास तयार होते. काही तरुण झाडावर तर काही जागा मिळेलं तिथे चढले होते. मात्र आपल्या मौजमजेसाठी प्रेक्षकांनी केलेल्या शाळेच्या या नुकसानीला कोण जबाबदार असा सवाल आता ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.