International Emmy Awards 2023: ज्या पुरस्काराची कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक आतूरतेनं वाट पाहत असतात त्या आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स 2023 च्या नामांकनांची घोषणा झाली आहे. या यादीत अनेक बॉलिवूड स्टार्सची वर्णी लागली आहे. .या जाहिर यादीत 20 देशांतील 56 नामांकित लोकांचा समावेश आहे. ज्यामध्ये भारतातून शेफाली शाह, जिम सरभ आणि वीर दास यांच्या नावाचाही समावेश आहे. दिल्ली क्राइम 2 या सिरिजसाठी शेफाली शाहला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले आहे. .इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2023 ची यादी 26 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. यात 20 वेगवेगळ्या देशांतील सुमारे 56 लोकांची 14 वेगवेगळ्या श्रेणीसाठी नामांकन देण्यात आले आहे. .Waheeda Rahman: देवानंदचं बड्डे गिफ्ट! फाळके पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर वहिदा यांची पहिली प्रतिक्रिया.महत्वाचे म्हणजे यात बॉलिवूडमधील काही लोकप्रिय चेहऱ्यांना देखील नामांकन मिळाल्यामुळे सर्व सेलेब्सचे अभिनंदन करत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी शेफाली शाह, जिम सरभ आणि कॉमेडियन वीर दास यांना भारतातून यंदाच्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे. यात शेफाली आणि जिम सरभला त्यांच्या OTT शोसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे.शेफालीला नेटफ्लिक्स सीरीज दिल्ली क्राइममध्ये डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेसाठी नामांकन मिळाले आहे. तर जिमला रॉकेट बॉईज या सिरिजसाठी डॉ. होमी जहांगीर भाबाची भूमिका साकारण्यासाठी नामांकन मिळाले आहे. .Zakir's Journey : उपाशी पोटी काढलेले दिवस ते आज बच्चन समोर हॉटसीट, प्रेरणादायी आहे झाकीरचा प्रवास.तर नेटफ्लिक्सवरील वीर दास: लँडिंग या शोसाठी वीर दासला नामांकन मिळाले आहे. वीर दासची स्पर्धा ही फ्रान्सचा ले फ्लॅम्बेउ, अर्जेंटिनाचा एल एनकार्गाडो आणि यूकेचा कॉमेडी शो डेरी गर्ल्स सीझन 3 यांच्यासोबत असले. .Aankh Micholi Trailer: लग्नासाठी मुलगी तयार पण झालीय एक गडबड, आँख मिचोली चा तुफान कॉमेडी ट्रेलर पाहाच. एकता कपूरला देखील आंतरराष्ट्रीय एमी डायरेक्टरेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतातही या पुरस्काराची मोठी क्रेझ वाढली आहे. हा सोहळा 20 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. यावेळचा पुरस्कारही मोठा खास आहे. त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.