इरफान खानची पत्नी सुतापाची वादग्रस्त मागणी, 'भारतात सीबीडी ऑईल कायदेशीर करा'

irfan khan wife sutapa
irfan khan wife sutapa
Updated on

मुंबई- बॉलीवूडमध्ये सध्या ड्रग्सच्या मुद्द्याने जोर धरलाय. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यामध्ये दीपिका पदूकोण, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची चौकशी केली गेली आहे. दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड आणि ड्रग्स केसमधील मुख्य आरोपी मानली जाणारी रिया चक्रवर्ती आणि धर्मा प्रोडक्शनचा पूर्व एक्झिक्युटीव्ह प्रोड्युसरला एनसीबीने या प्रकरणात अटक केली आहे. सुशांत सिंह मृत्यु प्रकरणात ड्रग एँगल समोर आल्यानंतर बॉलीवूड सगळ्यांच्या निशाण्यावर आहे. अनेकजण सोशल मिडियावर सेलिब्रिटींना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत आहेत आणि इंडस्ट्रीला दोष देत आहेत. या दरम्यान दिवंगत अभिनेता इरफान खानची पत्नी सुतापाने एक वादग्रस्त मागणी केली आहे. 

दिवंगत अभिनेता इरफान खानची पत्नी सुतापाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये तीने लंडनच्या त्या हॉस्पिटलचा फोटो शेअर केला आहे जिथे इरफान खानवर कॅन्सरची ट्रीटमेंट झाली होती. फोटो शेअर करत सुतापाने हे देखील सांगितलं की ती लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये पुन्हा येणं आणि या हॉस्पिटलच्या रुमला बाहेरुन पाहणं, मी असंच केलं होतं जेव्हा तो इथे होता. या कॅप्शनसोबत तिने हॅशटॅगमध्ये लीगलाईज सीबीडी ऑईल इन इंडिया असं लिहिलं आहे. आता सुतापाने अशी मागणी का केली आहे याबाबत अजुन कळु शकलेलं नाही. 

सुशांतच्या प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने सुशांतशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा तपास केला आहे. या दरम्यान त्याची टॅलेंट मॅनेजर जया शाहची चौकशी आणि तिच्या व्हॉट्सअपमधून काही सेलिब्रिटींची नावं समोर आली ज्यांच्यावर ड्रग घेणे आणि ड्रग पेडलरशी संबंध ठेवल्याचे आरोप करण्यात आले आहेत.   

irrfan khan wife sutapa sikdar demand to legalize cbd oil in india  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.