इरफान खानचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकाने सोडलं शिक्षण

बाबिलची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
babil khan with father irrfan khan
babil khan with father irrfan khanInstagram
Updated on

दिवंगत अभिनेता इरफान खानचा Irrfan Khan मुलगा बाबिल खान Babil हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोमवारी बाबिलने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. अभिनयावर, करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कॉलेज सोडत असल्याचं बाबिलने या पोस्टमध्ये लिहिलं. बाबिल हा युकेच्या वेस्टमिन्स्टर विद्यापिठात 'बॅचलर ऑफ आर्ट्स' ही पदवी घेत होता. मात्र आता एका चित्रपटाच्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी त्याने शिक्षण अर्धवट सोडलंय. (Irrfan Khans son Babil drops out of college to focus on acting)

बाबिल हा लवकरच दिग्दर्शिका अन्विता दत्तच्या आगामी चित्रपटातून पदार्पण करत आहे. शिक्षण सोडण्याविषयी त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'माझ्या प्रिय मित्रांनो, मला तुमची खूप आठवण येईल. माझे मुंबईत फक्त दोन-तीनच मित्र आहेत. तुम्हा सर्वांनी मला परदेशात आपलंसं केलं. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो. आज मी 'फिल्म बीए'चं शिक्षण सोडतोय, कारण आता मला माझं पूर्ण लक्ष अभिनयावर केंद्रित करायचं आहे. गुडबाय वेस्टमिन्स्टर विद्यापीठ', अशी भावूक पोस्ट त्याने सोशल मीडियावर लिहिली. सोबतच आठवणीच्या रुपात काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.

babil khan with father irrfan khan
इगतपुरी रेव्ह पार्टी: अटक झालेली 'मराठी बिग बॉस' फेम हिना पांचाळ कोण आहे?
babil khan with father irrfan khan
अचानक बंद करण्यात आल्या 'या' मराठी मालिका

२९ एप्रिल २०२० रोजी इरफान खानचं मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झालं. इरफानला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्याने परदेशात सुमारे दीड वर्ष उपचार घेतला. या आजारपणात त्याने 'अंग्रेजी मीडियम'चं शूटिंगसुद्धा पूर्ण केलं होतं. इरफानच्या निधनानंतर बाबिलने अनेकदा सोशल मीडियाद्वारे वडिलांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.