अभिनेत्री प्रियांका चोप्राने Priyanka Chopra इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरून जोनास Jonas हे आडनाव हटवल्यानंतर तिच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा झाली. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास Nick Jonas यांच्यामध्ये काहीतरी बिनसलंय, असे अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवले जाऊ लागले. प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं. तर खुद्द प्रियांकानेही निकच्या व्हिडीओवर रोमँटिक कमेंट करत घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. असं असलं तरी प्रियांकाने अचानक जोनास हे आडनाव का काढलं, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडिया अकाऊंट्सवरून आडनाव काढण्यामागचं कारण 'जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट' असू शकतो. जोनास भावंडांचा हा अत्यंत प्रसिद्ध कॉमेडी शो असून त्याच्या प्रमोशनसाठीच प्रियांकाने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.
केवीन, जो आणि निक या जोनास भावंडांचा 'जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट' हा कार्यक्रम २३ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हे तिघंही म्युझिक सुपरस्टार्स असून या कार्यक्रमातून त्यांची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यामध्ये प्रियांका चोप्रासुद्धा हजेरी लावणार आहे. जोनास भावंडांनी २००५ मध्ये स्वत:चा बँड तयार केला. 'जोनास' या डिस्ने चॅनलवरील सीरिजमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. २००६ ते २००९ या काळात या तिघांनी चार अल्बम्स प्रदर्शित केले. 'जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केनन थॉम्प्सन करणार आहे.
२०१७ मध्ये 'मेट गाला'मध्ये एकत्र हजेरी लावल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने त्यांचं नातं जगजाहीर केलं. वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर दोघं लग्नबंधनात अडकले. या दोघांनी १ डिसेंबर २०१८ रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं. प्रियांकाला प्रपोजल रिंग घेण्यासाठी निकने लंडनमधील नामांकित ज्वेलरीचं दुकान बंद करायला लावलं होतं. त्यानंतर निकने प्रियांकाला तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी फिरायला गेले असताना प्रपोज केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.