Israel Hamas Conflict: हमास हल्ल्यानंतर लोकांना वाचवण्यासाठी इस्राइली अभिनेता सरसावला पुढे! युद्धाचा भयावह व्हिडिओ व्हायरल

Israeli actor steps forward to save people after Hamas attack: इस्रायल हमास संघर्ष.
Israel Hamas Conflict Fauda Actor Lior Raz Joins Brothers In Arms Volunteer Group
Israel Hamas Conflict Fauda Actor Lior Raz Joins Brothers In Arms Volunteer GroupEsakal
Updated on

Israel Hamas Conflict: इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आतापर्यंत शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या युद्धामुळे झालेल्या विध्वंसाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

आता इस्राइलच्या संरक्षण दलाने स्पष्ट केले आहे की त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या हमासला ते नष्ट करतील, हाच त्यांचा शेवटचा उद्देश आहे.

आता जगभरात या युद्धाचे पडसाद पहायला मिळत आहे. त्यातच इस्राइलमधील लोक देखील आपल्या देशाला वाचवण्यासाठी या युद्धात सहभाग घेत आहेत.

Israel Hamas Conflict Fauda Actor Lior Raz Joins Brothers In Arms Volunteer Group
KBC 15: "आणि महानायकाला रडू कोसळलं", कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा भावूक व्हिडीओ

'फौदा' या टेलिव्हिजन मालिकेतुन जगभरात प्रसिद्ध झालेला इस्रायली अभिनेता लिओर राझ हा देखील आपल्या देशासाठी पुढे आला आहे. आता तो ब्रदर्स इन आर्म्स या स्वयंसेवकांच्या गटात सामील झाला आहे

लिओरला इस्रायली जेम्स बाँड म्हटले जाते. सैन्यात कमांडो होण्यापासून ते अरनॉल्ड श्वार्झनेगरचा बॉडीगार्ड आणि नंतर अभिनेता असा त्याचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे लिओरने या युद्धआत सहभाग घेतला आहे.

Israel Hamas Conflict Fauda Actor Lior Raz Joins Brothers In Arms Volunteer Group
Akshay Kumar: "अरे मी जाहिरात शुट केली कारण....", पान मसाला जाहिरातीच्या वादावर अखेर अक्षय कुमारनं सोडल मौन!

आता लिओरने युद्धादरम्यानचा स्वतःचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने दक्षिण इस्राइली शहर सेडरोटमधून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत इस्त्राइल डेमोक्रेसी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष योहानन प्लेसनर आणि पत्रकार अवी यिसाचारोव्ह देखील त्याच्यासोबत दिसत आहेत. व्हिडिओमध्ये हमास इस्राइलवर रॉकेट हल्ला करताना दिसत आहे.

लिओर राझने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे की, इस्राइलच्या दक्षिणेकडील लोकांची मदत करण्यासाठी खुपच परिश्रम घेतले. तो या व्हिडिओत म्हणतो की, शेकडो लोकांना वाचवण्यासाठी मी 'ब्रदर्स इन आर्म्स' स्वयंसेवक गटात सामील होण्यासाठी दक्षिणेकडे निघालो आहे. आम्हाला 2 कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी Sderot या शहरात पाठवण्यात आले.

या युदधाची सुरुवात शनिवारी सकाळी हमासने इस्राइलवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर सुरू झाली आहे, ज्यामध्ये 700 हून अधिक इस्राइली ठार झाले आणि 2,300 इतर जखमी झाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी हमासला कडक इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.