Naor Gilon : एक माणूस म्हणून मला लाज वाटतेय! 'कश्मीर फाईल्स'वरील टीकेवर इस्रायली राजदूतांनी मागितली माफी

इस्रायलमधील चित्रपट निर्माता नादव लॅपिड यांनी 'द कश्मीर फाइल्स'वर नाराजी व्यक्त करत या चित्रपटाला असभ्य, अश्लील चित्रपट म्हटलंय.
International Film Festival Naor Gilon
International Film Festival Naor Gilonesakal
Updated on
Summary

इस्रायलमधील चित्रपट निर्माता नादव लॅपिड यांनी 'द कश्मीर फाइल्स'वर नाराजी व्यक्त करत या चित्रपटाला असभ्य, अश्लील चित्रपट म्हटलंय.

IFFI या महोत्सवाच्या (IFFI Festival) समारोपाच्या कार्यक्रमात सर्वात जास्त चर्चा झाली ती मुख्य ज्यूरी आणि इस्रायलमधील चित्रपट निर्माता नादव लॅपिड (Nadav Lapid) यांनी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटावर नाराजी व्यक्त करत या चित्रपटाला असभ्य, अश्लील चित्रपट म्हटलंय.

International Film Festival Naor Gilon
Coronavirus : जनआंदोलनापुढं चीन सरकार पहिल्यांदाच झुकलं; बीजिंगसह अनेक शहरांतील कोरोना निर्बंध शिथिल!

द कश्मीर फाइल्स'ला IFFI सारख्या प्रतिष्ठित महोत्सवातील स्पर्धा विभागात परवानगी दिल्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. नादव लॅपिड हे गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (International Film Festival) मुख्य परीक्षक होते. चित्रपट निर्माते असलेल्या लॅपिड यांनी सोमवारी बोलताना ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर टीका केली होती. त्यांच्या या विधानावर भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन (Israel Ambassador Naor Gilon) यांनी नाराजी व्यक्त केलीय.

International Film Festival Naor Gilon
दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

कश्मीर फाईल्स या चित्रपटाबाबत (The Kashmir Files Movie) लॅपिड यांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं नाओर यांनी म्हटलंय. लॅपिड यांच्या विधानामुळं आम्हाला लाज वाटत असल्याचंही नाओर यांनी सांगितलंय. नाओर गिलोन यांनी म्हटलंय की, भारत आणि इस्रायल या दोन देशांत घनिष्ट मैत्री आहे. तुमच्यामुळं सहन कराव्या लागलेल्या नुकसानानंतरही ही मैत्री कायम राहील. एक माणूस म्हणून मला या प्रकाराबद्दल लाज वाटते. यजमान देशानं उदार मनानं तुमचं स्वागत केलं त्याचे तुम्ही अशा पद्धतीनं पांग फेडलेत, त्याबद्दल मी भारताची माफी मागत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()