Jacqueline Fernandez: मिस श्रीलंकन आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेले अनेक दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा महाठग मुकेश चंद्रशेखरसोबतच्या 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. मध्यंतरी तिला दिल्ली न्यायालयाने जमीन मंजूर करत दिलासा दिला. पण आता तिने दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँच समोर एक महत्वाचा जबाब नोंदवला आहे.
(Jacqueline Fernandez records ‘important’ statement with Delhi Police in Rs 200 crore money laundering case)
सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आल्यानंतर ती अडचणीत आली. ती आणि सुकेश यांचे निकटचे संबंध होते. सुकेशने तिला अनेक महागड्या गोष्टी भेट म्हणून दिल्या आहेत. त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचेही समोर आले , त्यामुळे या प्रकरणी जॅकलिनची कसून चौकशी होत आहे. मध्यंतरी पटियाला कोर्टातून तिला जामीन मिळाला , पण नुकत्याच झालेल्या चौकशीत तिने नवीन खुलासा केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनने पटियाला कोर्टात कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवला आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिनला काही नवीन खुलासे करायचे होते. त्यामुळे ईडीने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जॅकलिनचा जबाब नोंदवला आहे. ती नेमकं काय म्हणाली ही अद्याप समोर आलेलं नाही पण सुकेशला वाचवण्यासाठी तिने काही नवे वक्तव्य केल्याची चर्चा आहे. तर काहींच्या मते ती सुकेशच्या विरोधात बोलली आहे. आता या प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची पुढची सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे.
सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. सुकेशवर फसवणूक केल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले. त्यांनंतर साक्षीदार आणि पुराव्यांचा आधारे न्यायालयाने तिला समन्स दिला. सध्या सुकेश तुरुंगात आहे तर जॅकलिन जामिनावर बाहेर आहे,. तिला देश सोडून जाण्याची देखील परवानगी नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.