jacqueline fernandez : मिस श्रीलंकन आणि आता बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेले अनेक दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा महाठग मुकेश चंद्रशेखरसोबत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता जॅकलिन कोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे, पण तिचा पुढचा रस्ता सध्या सोपा दिसत नाही. कारण शनिवारी दिल्ली कोर्टाने तिचा जामीन १० नोव्हेंबरपर्यंत वाढवला, पण एक प्रश्न विचारून तिची चांगलीच झोप उडवली..
जॅकलिनचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण इतके गाजत आहे तरी हिचे नखरे काय कमी होत नाहीत. कोर्टात ईडीने सांगितले की, जॅकलिन तपासात सहकार्य करत नाही. यासोबतच जॅकलिनने पुराव्यांशी छेडछाड करत आहे, असे ईडीच्या वतीने सांगण्यात आले. एवढेच नाही तर तपासादरम्यान जॅकलिन देश सोडून जाण्याचाही प्रयत्न करत असल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला. पण एलओसीच्या कडक निगराणीमुळे जॅकलिनचा हा प्लान अपयशी झाला.
यापूर्वी, जॅकलिनला २६ सप्टेंबर रोजी ५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जॅकलिन ही मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. फसवणुकीच्या पैशाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. तिला या प्रकरणात ईडीने आरोपी बनवले आहे. एवढे पुरावे तिच्या विरूद्ध आहे तरी ही जॅकलिन म्हणते की, तिचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, मी स्वत: या प्रकरणात पीडित आहे.
असे असले तरी ईडी आणि न्यायालय तिची काही सुटका करतील असे चिन्ह दिसत नाही. कारण जर टी निर्दोष आहे तर भारतातून पळून जाण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न का करत होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.