Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड अन् सलमान खानचं कनेक्शन काय? उपराष्ट्रपतींशी संबंधित 'या' रंजक गोष्टी तुम्हाला माहितीये

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनखड यांच्याबाबत काही रंजन गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Salman Khan and Jagdeep Dhankhar Connection:
Salman Khan and Jagdeep Dhankhar Connection:Esakal
Updated on

Salman Khan and Jagdeep Dhankhar Connection: यंदाचे संसदेच्या हिवाळी अधिवेशन चांगलेच चर्चेत आहे. खासदारांच्या निलंबणामुळे, संसदेतील झालेल्या घुसखोरीमुळे अन् जगदीप धनखड यांच्या मिमिक्रीमुळे. तर मिमिक्री केल्यामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनखड हे चर्चेत आले आहेत.

निलंबीत खासदार संसद परिसरात आंदोलन करत असताना टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांची नक्कल केली. टीएमसी खासदारांनी नक्कल केल्यानं उपराष्ट्रपती जगदीप धनखड चांगलेच संतापले आणि त्यांनी हा 'जाट समाजाचा' अपमान असल्याचे म्हटले.

थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. यामुळे राजकीय वातावरण तर तापलचं मात्र जगदीप धनखड देखील चर्चेत आले. आता उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनखड यांच्याबाबत काही रंजक गोष्टी आम्ही माहित आहेत का?

जगदीप धनकड यांचा जन्म जयपूरच्या जाट कुटुंबात झाला. वकील म्हणून जगदीप धनखड यांनी राजस्थानमध्ये जाट यांनी आरक्षण देण्याची कायदेशीर लढाई लढली आणि ती जिंकली देखील. इतकच नाही तर जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, जगदीप धनखड हे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अन् किंग खान शाहरुख खानचे देखील वकील होते. सलमान खानची महत्वाची केस त्यांनी लढली होता. Latest Marathi News

Salman Khan and Jagdeep Dhankhar Connection:
Dunki Box Office: शाहरुखच्या 'डंकी'चा डंका वाजलाच नाय! प्रभासच्या सालारसमोर काही केल्या टिकेना! दुसऱ्या दिवशी किती कोटी कमावले?

1998 मध्ये राजस्थानमध्ये सलमान खानने हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटाची शिकार केली होती. त्यानंतर त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर सलमानला 6 दिवस जोधपूर तुरुंगात घालवावे लागले होते.

जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ वकील जगदीप धनखड हे सलमानचे वकील होते. जगदीप धनखड यांनी जिल्हा न्यायालयातून सलमानला जामीनही मिळवून दिला होता. 17 ऑक्टोबरला तो तुरुंगातून बाहेर आला.

Salman Khan and Jagdeep Dhankhar Connection:
Charlie Sheen: हॉलीवूड अभिनेता चार्ली शीनवर घरात घुसून हल्ला! संशयितास अटक

त्यानंतर हा खटला सुरूच राहिला आणि 2018 साली सलमान खानला जोधपूर येथील कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविले आले आणि त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 5 एप्रिल 2018 रोजी त्यांची रवानगी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. त्यानंतर 7 एप्रिल रोजी त्याला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला, तेव्हापासून सलमान तुरुंगाबाहेर आहे तरी देखील हे प्रकरण अजून सुरु आहे.

Salman Khan and Jagdeep Dhankhar Connection:
Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात तुफान राडा! विकीनं उचलला अंकितावर हात! नेटकऱ्यांचा संताप

सलमान खानच्या या प्रकरणापुर्वी ते शाहरुख खानचे देखील वकिल होते. 1995 साली शाहरुख खानच्या 'राम जाने' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खानने वकिलांसाठी अपमानास्पद संवाद बोलल्याने त्याच्यावर तक्रार दाखल झाली होती. यावेळी 1997 मध्ये जगदीप धनखड या प्रकरणी शाहरुखचे वकील होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.